• Download App
    हैदराबादेतून 6 लाख मतदारांची नावे हटवली; मोठ्या उलथापालथीची शक्यता, बोगस मतांचा सफाया|Names of 6 lakh voters deleted from Hyderabad; Chances of major upheaval, purge of bogus votes

    हैदराबादेतून 6 लाख मतदारांची नावे हटवली; मोठ्या उलथापालथीची शक्यता, बोगस मतांचा सफाया

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : निवडणूक आयोगाने ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील सुमारे ६ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. हटवलेली नावे मरण पावल्या व्यक्ती, इतरत्र स्थायिक झालेले किंवा बनावट होती.Names of 6 lakh voters deleted from Hyderabad; Chances of major upheaval, purge of bogus votes



    एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादच्या निकालावर याचा परिणाम होणार, हे निश्चत. असदुद्दीन ओवेसी २००२ पासून या जागेवर विजयी होत आहेत. काही वर्षांपासून फिरोज खानसारखे भाजप व काँग्रेसचे नेते दुबार किंवा खोट्या मतदारांचा मुद्दा उपस्थित करत होते.

    हैदराबादमध्ये विधानसभेच्या सात जागा जिंकणारे एमआयएम याच मतांच्या फेरफारातून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप आहे.

    एकट्या ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात तब्बल 60,953 डुप्लिकेट मते आढळून आले. त्यापैकी 3,101 नावे मृत, 53,012 मते इतरत्र स्थायिक झालेल्यांची आहेत. चंद्रयांगुट्टा व याकूतपुरा विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे 59,289 व 48,296 मते हटवण्यात आली. 2019 मध्ये हैदराबाद लोकसभेत 20 लाख मतदार होते. त्यापैकी 12% मते कमी झालीत. मात्र, वर्षभरात जिल्ह्यात 5 लाख नवी नावे समाविष्ट झाली.

    Names of 6 lakh voters deleted from Hyderabad; Chances of major upheaval, purge of bogus votes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार