नलिनीचा १ महिन्यांचा पॅरोल २४ किंवा २५ डिसेंबरपासून सुरू होईल.Nalini Shriharan convicted in Rajiv Gandhi assassination case granted one month leave
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तामिळनाडू सरकारने गुरूवारी राजीव गांधी हत्या प्रकरणाती दोषी नलिनी श्रीहरणच्या एक महिन्यांच्या पॅरोलला मंजूरी दिली आहे. आज कागदोपत्री प्रक्रिया पार पडताच नलिनी तुरुंगातून बाहेर पडणार आहे.राजीव गांधी हत्या प्रकरणातील ७ दोषींपैकी नलिनी एक आहे.आजारी आईला भेटण्यासाठी नलिनीचा हा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
नलिणीची आई पद्मा यांना अनेक आजार आहेत, त्यामुळे मुलगी नलिनी ही महिनाभर तिच्याजवळ राहावी, अशी इच्छा नलिनीची आई पद्मा यांनी याचिकेत व्यक्त केली आहे.नलिणीचा १ महिन्यांचा पॅरोल २४ किंवा २५ डिसेंबरपासून सुरू होईल.राज्याचे विशेष सरकारी वकील हसन मोहम्मद जिनाह यांनी मद्रास न्यायालयाला सांगितले की, सरकारने नलिनीचा जामीण मंजूर केला आहे.
नलिनी सध्या वेल्लोरे तुरुंगात आपली शिक्षा भोगते आहे. ३० वर्षांपासून नलिनी तुरुंगात शिक्षा भोगत असून मद्रास उच्च न्यायालयाकडून तिला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.सन १९९८ मध्ये नलिनीला एका सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.दरम्यान त्याच शिक्षेला २००० साली जन्मठेपेत बदलण्यात आले.
२०१८ मध्ये एआयएडीएमके सरकारने ७ दोषींची सुटका करण्यासाठीचा प्रस्ताव सर्वानुमते विधानसभेत पारीत केला होता. पुढे राज्यपालांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, २ वर्षात या प्रस्तावावर काहीही निर्णय घेण्यात आला नसून त्यानंतर या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच आहे, असे अखेर राज्यपालांकडून सांगण्यात आले होते.
Nalini Shriharan convicted in Rajiv Gandhi assassination case granted one month leave
महत्त्वाच्या बातम्या
- कॉंग्रेसचे सगळेच आमदार वाळू माफिया, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांचाच आरोप
- उत्तरप्रदेशात रॅलीवर बंदी घाला , विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलण्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे मोदींना आवाहन
- सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ,उदयनराजे झाले भावूक; म्हणाले…
- महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या वाढीव संकटात पुन्हा निर्बंध, आज नवी नियमावली; मुख्यमंत्री – टास्क फोर्स बैठकीत निर्णय