• Download App
    नागनाथ - सापनाथ : तोंडी काशीराम यांची भाषा वापरत स्वामी प्रसाद मौर्य अखेर समाजवादी पक्षात!!। Nagnath - Sapnath: Swami Prasad Maurya finally joined the Samajwadi Party using the language of oral Kashiram !!

    नागनाथ – सापनाथ : तोंडी काशीराम यांची भाषा वापरत स्वामी प्रसाद मौर्य अखेर समाजवादी पक्षात!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : भाजपवर तोफा डागत पक्षातून बाहेर पडलेले मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज अखेर समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तोंडी काशीराम यांची भाषा वापरत स्वामी प्रसाद मौर्य यांनी बहुजन समाज पक्षाऐवजी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मार्ग निवडीला आहे. Nagnath – Sapnath: Swami Prasad Maurya finally joined the Samajwadi Party using the language of oral Kashiram !!

    आरएसएस रूपी नागाला आणि भाजप रुपी सापाला स्वामी रुपी नेवला म्हणजे मंगुस खतम करूनच दम घेईल, असे वक्तव्य स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या वक्तव्याला मूळ संदर्भ बहुजन समाज पक्षाचे सुप्रीमो काशीराम यांचा आहे. काशीराम यांनी 1990 च्या दशकात बहुजन समाज पक्षाची उभारणी करताना भाजपला नागनाथ आणि काँग्रेसला सापनाथ अशी उपमा दिली होती. नागनाथ भाजप आणि सापनाथ काँग्रेस यांना संपवल्या खेरीज बहुजनांना न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले होते.



    मात्र त्यानंतर देखील बहुजन समाज पक्षाची काही काळ भाजपशी उत्तर प्रदेशात युती होती. मायावती आणि कल्याण सिंग हे दोघे आलटून-पालटून या युतीचेच मुख्यमंत्री राहिले होते. पण काशीराम यांनी वापरलेली नागनाथ आणि सापनाथ ही भाषा मात्र राजकीय वर्तुळात कायमस्वरूपी लक्षात राहिली. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी अनेकदा ही जाहीर भाषणांमध्ये भाषा वापरली आहे.

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताना काशीराम यांची भाषा वापरत आरएसएस रुपी नागाला आणि भाजप रुपी सापाला हा स्वामी रुपी नेवला अर्थात मुंगूस संपवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. अखिलेश यादव यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपमधून बाहेर पडलेल्या अनेक आमदारांचे आणि मंत्र्यांचे समाजवादी पक्ष स्वागत केले आहे.

    Nagnath – Sapnath: Swami Prasad Maurya finally joined the Samajwadi Party using the language of oral Kashiram !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य