• Download App
    काँग्रेसच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात तीव्र नाराजी, अभिनेत्री नगमाचे थेट सोनियांचे नाव घेऊन शरसंधान nagama : am i less deserving congs nagma reacts after being denied rajya-sabha

    काँग्रेसच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात तीव्र नाराजी, अभिनेत्री नगमाचे थेट सोनियांचे नाव घेऊन शरसंधान

    वृत्तसंस्था

    मुंबई – महाराष्ट्रात काँग्रेसची मते मर्यादित राज्यसभा निवडणूकीत उमेदवार निवडून येणार १. तरीही उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसजनांमध्ये नाराजी उफाळली आहे. am i less deserving congs nagma reacts after being denied rajya-sabha

    काँग्रेसने राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहेच. पण अभिनेत्री नगमा हिने थेट सोनिया गांधी यांचे नाव घेऊन शरसंधान साधले आहे.



    मी सन २००३ – ०४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा स्वतः सोनिया गांधी यांनी मला राज्यसभेवर जाण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मी निष्ठेने आजपर्यंत काँग्रेसचे काम करीत आले आहे. इम्रानला दिलेला शब्द काँग्रेसने पाळला. मग मी राज्यसभेसाठी लायक नव्हते का, असा सवाल नगमा हिने ट्विटरवर विचारला आहे.

    काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीतला तिसरा घटक म्हणून सत्तेत आहे. पण पक्षाचे नेते निधी वाटप, सत्तेची पदे वाटप या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहे. त्यातच आता इम्रान प्रतापगडी या युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला महाराष्ट्रातून राज्यसभेची संधी देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसते आहे. महाराष्ट्रातून याच राज्यातील नेत्याला संधी द्यायची होती, अशी काँग्रेस नेत्यांची भावना आहे. नगमा हिने तर थेट सोनिया गांधींचे नाव घेऊन त्यांच्यावर शरसंधान साधले आहे.

    nagama : am i less deserving congs nagma reacts after being denied rajya-sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!