Thursday, 8 May 2025
  • Download App
    मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये आलोय; लुईजिनो फालेरोंचे वक्तव्यMy main mission behind joining TMC is to defeat BJP & its divisive policies

    मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये आलोय; लुईजिनो फालेरोंचे वक्तव्य

    वृत्तसंस्था

    कोलकाता : गोव्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते लुईजिनो फालेरो यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आपण काँग्रेस परिवाराला एकत्र करण्यासाठी काँग्रेस सोडून तृणमूल मध्ये दाखल झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.My main mission behind joining TMC is to defeat BJP & its divisive policies

    ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत फालेरो यांच्यासह गोव्यातील 10 काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांना लवकर गोव्यात भेट देण्याची विनंती केली.

     

    फालेरो म्हणाले की, गोव्यामध्ये खऱ्या अर्थाने भाजपला पर्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काँग्रेस तेथे लढण्यास सक्षम उरलेली नाही. काँग्रेस परिवार एकत्र करून आम्ही भाजपला तेथे टक्कर देऊ इच्छितो. लवकरात लवकर ममतादीदींनी गोव्याला भेट द्यावी यासाठी मी त्यांना विनंती केली आहे.

    खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, गोव्यात एकेकाळी काँग्रेस प्रबळ होती. परंतु आता काँग्रेसची भाजपशी लढण्याची इच्छा उरलेली दिसत नाही. काँग्रेस पक्ष सध्या जिल्हा थंड पडला आहे. पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे. भाजप सर्व राज्यांमध्ये प्रबळ होत असताना आमच्यासारखे कार्यकर्ते आराम खुर्च्यांमध्ये स्वस्थ बसून राहू शकत नाहीत. आम्ही काँग्रेस विचारसरणीचे लोक एकत्र करून भाजपशी संघर्ष करू, अशी ग्वाही अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.

    तृणमूल काँग्रेस येत्या तीन महिन्यांमध्ये गोव्यात चांगल्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी करून भाजपला समोरासमोर टक्कर देण्याची तयारी करेल. गोवा काँग्रेस विचारसरणीचे राज्य आहे. तेथे तृणमूल काँग्रेसला विस्तार करण्यासाठी मोठा वाव आहे, याची आम्हाला जाणीव आहे. पुढच्या तीन महिन्यात गोव्यात संघटनेचा विस्तार करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि मी स्वतः गोव्याचे दौरे करणार आहोत असे अभिषेक बॅनर्जी यांनी जाहीर केले.

    My main mission behind joining TMC is to defeat BJP & its divisive policies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : ऑपरेशन सिंदूर : अमित शहा अ‍ॅक्शनमध्ये, सीमावर्ती राज्यांच्या बैठकीत दिल्या विशेष सूचना

    Operation sindoor : लाहोरमधल्या पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर भारताचा हल्ला, यंत्रणा पूर्ण निकामी; भारतीय संरक्षण मंत्रालयाची अधिकृत माहिती!!

    Operation Sindoor : सर्व महत्त्वाच्या खात्यांच्या सचिवांची पंतप्रधानांसमवेत बैठक; सुरक्षा आणि समन्वयाच्या केल्या महत्वपूर्ण सूचना!!

    Icon News Hub