झीशान सिद्दीकी यांनी एका पोस्टमध्येद्वारे आपले म्हणणे मांडले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Baba Siddiquis गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली. या घटनेनंतर त्यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दिकी म्हणाले की, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे. वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नये आणि त्यांचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये, असे आवाहनही झिशान सिद्दिकी यांनी केले आहे.Baba Siddiquis
झीशान सिद्दीकी यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांच्या जीवाचे रक्षण करताना आणि त्यांच्या घरांचे रक्षण करताना आपला जीव गमावला. माझे कुटुंब कोलमडले आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये आणि ते नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.’
बाबा सिद्दीकी 66 वर्षांचे होते. 13 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रात्री 9.30 च्या सुमारास झीशान यांच्या वांद्रे पूर्वमधील कार्यालयाबाहेर तीन जणांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या आणि दुसरी गोळी त्यांच्या एका साथीदाराच्या पायाला लागली. सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
My family wants justice Zeeshan Siddiquis statement on Baba Siddiquis murder
महत्वाच्या बातम्या
- Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली जाणार?
- Prashant Kishor प्रशांत किशोर यांची निवडणुकीच्या राजकारणात एन्ट्री
- Sambhji raje : संभाजीराजेंना भाजपने दिली खासदारकी; ठाकरे आणि काँग्रेसने केली कोंडी, तरी….
- MUDA scam : MUDA घोटाळ्याप्रकरणी अध्यक्षांचा राजीनामा; पत्रात म्हटले- मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, तब्येतीमुळे खुर्ची सोडली