• Download App
    ‘’मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले अन् माझ्या मुलीने तिच्या पतीला पंतप्रधान’’ My daughter made her husband a statement by Prime Minister Rishi Soonaks mother in law Sudha Murthy

    ‘’मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले अन् माझ्या मुलीने तिच्या पतीला पंतप्रधान’’

    ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांचे विधान!

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांची मुलगी अक्षता मूर्ती यांनी पतीला पंतप्रधान केले. सुधा मूर्ती यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, त्यांच्या मुलीमुळेच ऋषी सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले आहेत. व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती हे म्हणताना दितात की, “मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले. माझ्या मुलीने तिच्या पतीला यूकेचे पंतप्रधान बनवले.” My daughter made her husband a statement by Prime Minister Rishi Soonaks mother in law Sudha Murthy

    सुधा मूर्ती यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, “याचे कारण पत्नीची महिमा आहे. पाहा कशाप्रकारे एक पत्नी तिच्या पतीला बदलू शकते, पण मी माझा पतीला बदलू शकले नाही. मी माझ्या पतीला उद्योजक बनवले आणि माझ्या मुलीने तिच्या पतील पंतप्रधान बनवले.” ऋषी सुनक यांनी २००९मध्ये अक्षता मूर्तीशी विवाह केला. यानंतर आगामी काही वर्षांत त्यांनी वेगाने प्रगती केली. सुधा मूर्ती यांनी असेही सांगितले की त्यांच्या मुलीने ऋषी सुनक यांच्या जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव टाकला, विशेषतः त्यांच्या आहारावर.

    सुधा मुर्ती यांनी अक्षता आणि सुनक एकमेकांची काळजी कशी घेतात हे देखील सांगितले. त्या म्हणाल्या की, अक्षताला नेहमी ऋषीच्या जेवणाची काळजी असते. दुसरीकडे, ऋषी सुनक हे आपल्या परंपरांची खूप काळजी घेतात.

    त्यांनी हेहे सांगितले की, ‘’मूर्ती कुटुंबात दर गुरुवारी उपवास करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. सुनक कुटुंबीय अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत असले, तरी ऋषी सुनक खूप धार्मिक आहेत. त्यांनी माझ्या मुलीशी लग्न केले आणि ते मूर्ती कुटुंबाची परंपरा देखील सांभाळतात. लग्न झाल्यापासून ते गुरुवारी उपास करत आहेत. तर त्यांची आई दर सोमवारी उपवास करते.’’

    My daughter made her husband a statement by Prime Minister Rishi Soonaks mother in law Sudha Murthy

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र