• Download App
    महाविकास आघाडीला यश पचेना; महायुती अपयशातून शिकेना!! MVA leaders not able to digest their success, Mahayuti leaders not able to learn from their own failure!!

    महाविकास आघाडीला यश पचेना; महायुती अपयशातून शिकेना!!

    नाशिक : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना यश पचेना, महायुतीचे नेते अपयशातून शिकेनात!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे. लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळवण्याचे महाविकास आघाडीचे यश हे त्यांच्या एकजिनसी राहण्याचे आहे, तर महायुतीचे अपयश त्यांच्या राजकीय ढिलाईत आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी एकत्र राहून संयमाने ते यश पचविले पाहिजे, तर फक्त 17 जागा मिळवू शकल्याचे अपयश महायुतीने झटकून टाकून एकदिलाने कामाला लागले पाहिजे. पण प्रत्यक्षात हे चित्र दिसण्याऐवजी विपरीतच चित्र दोन्हीकडे दिसते आहे. MVA leaders not able to digest their success, Mahayuti leaders not able to learn from their own failure!!

    • विधान परिषद निवडणुकीतील दोन्ही घटकांमधील बेबनाव
    • राज्यसभा निवडणुकीत उमेदवार ठरेना
    • पक्षाचा वर्धापन दिन असताना प्रदेशाध्यक्ष विरुद्ध तरुण नेते राष्ट्रीय अध्यक्षांसमोर भांडतात
    • घटक पक्षांमध्ये नेते फोन करतात पण दुसरे नेते फोनच उचलत नाहीत
    • असले प्रकार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुरू आहेत
    • महाविकास आघाडीतल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीतले यश पचायला तयार नाही महाविकास आघाडी एकत्र ठेवून महायुतीवर मात केल्यावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना विधानसभा निवडणुकीसाठी “स्व”बळाचे धुमारे फुटले. प्रत्येकाने 288 जागा लढविण्याची भाषा केली.
    • पण विधान परिषद निवडणुकीमध्ये 4 जागांवर प्रत्येकाने आपापले दावे सांगितले. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला, तर त्यांनी त्यांचा फोनही घेतला नाही नाशिकमध्ये परस्पर उमेदवार जाहीर करून ठाकरे मोकळे झाले.
    • महायुतीत देखील भाजप, शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यात समन्वय दिसला नाही तिन्ही पक्षांनी परस्पर आपले उमेदवार जाहीर करण्याचे आव आणले. प्रत्यक्षात भाजप व शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. पण हे करताना भाजप आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला.
    • भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सत्तेच्या वळचणीला आणून बसवलेच का??, अशा कानपिचक्या संघाच्या ऑर्गनायझर या नियतकालिकातून संघ विचारवंतांनी दिल्या, पण अजित पवारांना 11 महिन्यांपूर्वी सरकारमध्ये घेताना संघ विचारवंतांना हे सुचले नव्हते का??, हा सवाल त्यामुळे तयार झाला.
    • लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे अपयश येऊन देखील त्यांना राज्यसभेचे उमेदवार ठरवता येईनात. पत्नीला उमेदवारी द्यायची की मुलाला उमेदवारी द्यायची या पेचात अजित पवार अडकल्याची बातमी आली. अजित पवारांना राज्यसभा उमेदवारी मध्ये पण घरापलीकडचे काही दिसत नाहीत, अशी टीका आता होऊ लागली.
    • बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तरी देखील पुण्याच्या राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री करण्याचा ठराव संमत केला. जणू काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्याच्या युनिटने ठराव संमत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुनेत्रा पवारांना मंत्री करणारच आहेत, असा अविर्भाव अजितदादांच्या राष्ट्रवादीने आणला.
    • नगरमध्ये सुजय विखे पाटलांचा राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला राष्ट्रवादीचा स्थापना दिनाचे सेलिब्रेशन शरद पवारांनी निलेश लंकेच्या मतदारसंघात केले. पण या सेलिब्रेशन मध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा कलगीतुरा रंगला पवारांच्या सेलिब्रेशन ऐवजी या कलगीतुऱ्याच्या बातम्या माध्यमांमध्ये जास्त आल्या. बाकी पवारांनी मोदींना काय सुनावले, वगैरे बातम्या चौकटीत गेल्या.

    या सगळ्या बातम्यांमधून महाविकास आघाडीला यश पचेना आणि महायुतीतले नेते अपयशातून शिकेनात!!, हे सिद्ध झाले.

    MVA leaders not able to digest their success, Mahayuti leaders not able to learn from their own failure!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!

    Kulbhushan Jadhav : कुलभूषण पाकिस्तानातील हायकोर्टात करू शकणार नाहीत अपील; फक्त कॉन्सुलर सहाय्य प्रदान केले