• Download App
    भारतीय मुस्लिमांमध्ये हिंदूंपेक्षा प्रजनन दर जास्त, प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल | Muslims in india have high fertility rate than major religious hindu group, pew research center report

    भारतीय मुस्लिमांमध्ये हिंदूंपेक्षा प्रजनन दर जास्त, प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील मुस्लिमांचा   प्रजनन दर हिंदू धार्मिक लोकांपेक्षा जास्त आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोक हे हिंदू धार्मिक आहेत. त्याच्यानंतर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन असे अल्पसंख्याक गट आहेत. पण त्या सर्वांमध्ये देखील प्रजनन क्षमता कमी झाल्याचे यांच्या सर्वेक्षणानुसार दिसून येते.

    Muslims in india have high fertility rate than major religious hindu group, pew research center report

    १९९२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार मुस्लिमांमध्ये प्रजनन दर प्रत्येक महिलेमागे ४.४ होता. तर हिंदू धर्म समुदायाचा ३.३ इतका प्रजनन दर होता. हाच दर २०१५ साली मुस्लिम समुदायाचा २.६ इतका होता तर हिंदू समुदायाचा २.१ इतका होता. भारतातील प्रमुख धार्मिक गटांमध्ये मुस्लिमांमधील पेक्षा  प्रजनन दर अजूनही कमीच आहे. हिंदूंमध्ये २.१ तर जैन धर्म समुदायाचा प्रजनन दर  १.२ इतका आहे. जैन समुदायाचा प्रजनन दर भारतातील सर्वांत कमी प्रजनन दर आहे.


    Hindu – Muslim DNA; द्ग्विजयसिंगांनी उकरून काढला धर्मांतरविरोधी, लव जिहादविरोधी कायद्याचा मुद्दा


    प्रजनन दरातील या भिन्नतेमुळे भारतातील मुस्लीम लोकसंख्या इतर धार्मिक गटांपेक्षा जास्त वेगाने वाढली आहे. परंतु प्रजनन पध्दती कमी होण्याच्या आणि बदलण्याच्या अंशतः कारणाने भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिली जनगणना केली तेव्हा १९५१ पासून लोकसंख्येच्या एकूण धार्मिक रचनेत फक्त माफक बदल झाले आहेत.

    शिक्षण, संपत्ती, चांगली नोकरी, आरोग्याच्या उत्तम सेवा उपलब्ध असतील तर स्त्री कमो मुले जन्माला घालण्याचा विचार करते. तर शिक्षण हा या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे म्हणता येईल.

    Muslims in india have high fertility rate than major religious hindu group, pew research center report

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!