जाणून घ्या कारण ; गुजरात दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
विशेष प्रतिनिधी
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांना ताब्यात घेतले आहे. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील घाटकोपर भागातून ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.Muslim religious leader Maulana Mufti Salman Azhari arrested
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना मुफ्ती यांना सध्या घाटकोपर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १५३ अ, ५०५, १८८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मौलाना मुफ्ती यांना ताब्यात घेतल्यानंतर शेकडो लोक जमा झाले होते. एटीएस मौलानासोबत कधीही मुंबई सोडू शकते, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौलानाने बुधवारी गुजरातमधील जुनागढ येथील एका मोकळ्या मैदानात आयोजित कार्यक्रमात द्वेषपूर्ण भाषण दिले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मौलाना मुफ्ती आणि कार्यक्रमाचे स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तेव्हापासून मौलानाचा शोध सुरू होता.
Muslim religious leader Maulana Mufti Salman Azhari arrested
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन यांचा पलटवार- ममता दीदी भाजपला घाबरतात, म्हणूनच त्या त्यांची भाषा बोलतात
- इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला ‘बेकायदेशीर विवाह’ प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा
- पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला राजीनामा
- अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “सेक्युलर” पर्याय निवडून मुंबईतल्या काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांचा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याचा डाव!!