• Download App
    एका मुस्लीम कृष्णभक्ताने गायले महाभारताचे शीर्षक गीत | Muslim person singing mahabharata its title track goes viral on internet

    एका मुस्लीम कृष्णभक्ताने गायले महाभारताचे शीर्षक गीत

    विशेष प्रतिनिधी 

    हिंदू मुस्लीम मुद्द्यावर अनेक फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसून येतात. यापैकी काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक. नकारात्मक कंटेंटचा वापर काही समाजकंटक समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी वापरताना दिसून येतात.

    Muslim person singing mahabharata its title track goes viral on internet

    धर्म ही संकल्पना लोकांनी लोकांसाठी बनवलेली असताना कधी ती पूर्णपणे राजकारणाचा भाग होऊन गेली? धर्माच्या नावाचे राजकारण कधी सुरू झालं? याचा इतिहास खोदून काढायचा म्हटला तर काही मूठभर लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी निर्माण केलेली घाणच फक्त हातात येईल. असो.


    Hindu – Muslim DNA; द्ग्विजयसिंगांनी उकरून काढला धर्मांतरविरोधी, लव जिहादविरोधी कायद्याचा मुद्दा


    सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय. यामध्ये एक मुसलमान व्यक्ती महाभारताचे शीर्षक गीत अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरामध्ये गाताना दिसून येत आहेत. डॉक्टर नागर यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही कालावधीच्या आतच प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय. स्पष्ट उच्चार, अचूक लय आणि गाण्यातील प्रत्येक शब्दांवर असलेली श्रद्धा या व्यक्तीच्या आवाजात स्पष्ट झळकत आहे. या व्यक्तीवर मात्र नेटकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येतोय.

    Muslim person singing mahabharata its title track goes viral on internet

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य