• Download App
    ज्ञानवापीतील व्यास तळघरातील पूजेनंतर मुस्लिमांचा संताप, बनारस बंदची हाक; परिस्थिती चिघळवण्याचा डाव!! Muslim outrage after worship at Vyas basement in Gyanvapi

    ज्ञानवापीतील व्यास तळघरातील पूजेनंतर मुस्लिमांचा संताप, बनारस बंदची हाक; परिस्थिती चिघळवण्याचा डाव!!

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : ज्ञानवापी मशिदीमधील व्यासांच्या तळघरामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पूजा सुरु करण्यात आल्यानंतर अंजुमन इंतजामिया कमेटीने आज म्हणजेच शुक्रवारी बनारस बंदची हाक दिली आहे. आजचा मुस्लीम समाजासाठी शुक्रवारच्या पवित्र प्रार्थनेचा दिवस म्हणजेच “जुम्मे का दिन” असल्याने बंदची हाक देऊन मुस्लिमांना भडकविण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ज्ञानवापीसह बनारसमधील सर्व छोट्या – मोठ्या मशिदींच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवावा लागून बनारसमधल्या मुस्लिम परिसरात लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. Muslim outrage after worship at Vyas basement in Gyanvapi

    ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुरक्षारक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. पण काशी विश्वनाथाचे दर्शन व्यवस्थित सुरू आहे. पोलिसांनी संपूर्ण वाराणसीमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. आजूबाजूच्या 3 जिल्ह्यांमधून अतिरिक्त कुमक ज्ञानवापी परीसरातील सुरक्षेसाठी मागवली आहे.

    बनारस बंदची हाक

    व्यासजी तळघरामध्ये पूजेला परवानगी दिल्याच्या निर्णयाविरोधात अंजुमन मशीद इंतजामिया कमेटीने आज मुस्लिम परिसरामध्ये बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले. आज दुकानं बंद ठेवावीत आणि शांततापूर्ण मार्गाने आपल्या परिसरामध्ये नमाज पठण करावे असे कमिटीने आवाहनात नमूद केले. बनारस बंदची हाक देण्यात आल्याने पोलिसांनी अधिक बंदोबस्त ठेवला असून पोलीस अधिक सतर्क झाले. गुरुवारीच शहरामध्ये पोलीस फोर्सने फ्लॅग मार्चही केला. 3 कंपन्या पीएसी, आरएएफबरोबरच गाझीपूर, चंदौली आणि जौनपूरच्या पोलीस दलाच्या तुकड्यात यात सहभागी झाल्या होत्या.

    पोलिसांना देण्यात आले हे निर्देश

    मुस्लिमांची संख्या अधिक असलेल्या परिसरामध्ये विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. बाहेरुन मागवण्यात आलेल्या तुकड्यांबरोबरच पीएसी तुकड्यांनी या परिसरामध्ये गस्त घातली. अतिसंवेदनशील परिसरामध्ये आरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना छोट्या-मोठ्या सर्वच मशिदींबाहेर योग्य संख्येनं पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही धार्मिक स्थळांबाहेर गर्दी होता कामा नये याची काळजी घेण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

    हायकोर्टात जाणार प्रकरण

    व्यासजी तळमजल्यामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर मुस्लीम पक्षाकडून या निकालाला इलाहाबाद हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी आज सुनावणी होऊ शकते. हिंदू पक्षाकडूनही या प्रकरणी कॅव्हेट दाखल करण्यात आली असून आमचे म्हणणेही ऐकून घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

    Muslim outrage after worship at Vyas basement in Gyanvapi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य