विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुस्लिम पुरुषांना आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी कुराण वाचावे असा सल्ला अभिनेत्री उर्फी जावेदने दिला आहे. उर्फीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.Muslim men should change their attitude before criticizing me, alias Javed replied to the critics
आपल्या फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं आपण इस्लाम मानत नसल्याचं म्हणत सर्वांना चकीत केलं होतं. मुस्लीम कट्टरपंथीयांनी तिच्यावर टीकाही केली होती. त्यावर आता उफीर्नं यावर मौन सोडत टीकाकारांना उत्तर दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये उर्फी म्हणते, जे माझ्या फोटोंवर सातत्यानं कमेंट करून मी इस्लामच्या नावावर डाग आहे, माझ्या विरोधात फतवा काढायला हवा, माझे कपडे असे नाहीत तसे नाहीत असं म्हणतात,
त्या सर्व मुस्लीम कट्टरपंथीयांना मी सांगू इच्छिते की, कुराणमध्ये हे कुठेही लिहिलेलं नाही की एका स्त्रीला तुम्ही जबरदस्ती करून बुरखा घालायला लावा किंवा अंगभर कपडे घालायला लावा. हे नक्कीच लिहिलं आहे की स्त्रीने पूर्ण कपडे घालायला हवे. पण जर ती असं करत नसेल तर तिला शिवीगाळ करा,
तिला जबरदस्ती करून पूर्ण कपडे घालायला लावा असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही जाऊन पुन्हा एकदा कुराण वाचायला हवं. कारण त्यात हे लिहिलं आहे की, पुरुषांनी महिलांकडे चांगल्या नजरेनं पाहावं, त्यांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.
सोशल मीडियावर मुलींचे फोटो पाहणेच हराम असल्याचे उर्फीने म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, एक पुरुष लग्नाआधी मुलींना चुकीच्या नजरेनं पाहू शकत नाही. त्यामुळे जे लोक इन्स्टाग्रामवर मुलींचे फोटो पाहतात. त्यांच्या फोटोंवर चुकीच्या कमेंट करतात. हे सर्व चुकीचं आहे. तुम्ही असं करू शकत नाही.
तुम्ही अशा महिलांचे किंवा मुलींचे फोटो पाहू शकत नाही. खासकरून तेव्हा जेव्हा तिने पूर्ण कपडे घातलेले नाही. हे तुम्ही खूप चुकीचं करत आहात. इस्लामचे जे नियम आहेत ते दीड हजार वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. त्यावेळी महिलांकडे कोणतेही अधिकार नव्हते.
इस्लामधील चार लग्नांची पद्धती तसेच लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणे अशा विषयांवर उर्फी म्हणते, लग्नाआधी शरीर संबंध ठेवणं इस्लामच्या नियमांनुसार चुकीचं आहे तरीही लोक ते करतात. स्त्रियांना चुकीच्या नजरेतून किंवा चुकीच्या दृष्टीकोनातून पाहणं जेव्हा बंद कराल तेव्हाच तुम्ही खरे मुस्लीम होऊ शकाल.
Muslim men should change their attitude before criticizing me, alias Javed replied to the critics
महत्त्वाच्या बातम्या
- नानांची सटकली, पक्षातीलच विरोधकांना धडा शिकविण्याचा दिला इशारा
- गाडलाच…सिंधूदूर्ग जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर नितेश राणे यांची एका शब्दांत प्रतिक्रिया
- कंगना रनौतची मागणी न्यायालयाने फेटाळली, सुनावणी घेणाऱ्या न्यायालयावर भरोसा नसल्याचा केला होता आरोप
- जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे दोन लाखांवर रुग्ण, तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घेण्याचे आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
- गोव्याचा वापर राजकीय प्रयोगशाळेप्रमाणे करण्याचा प्रयत्न गोवेकरच हाणून पाडतील, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका