विशेष प्रतिनिधी
लखनौ : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आणि उरलेल्या पानांवर कम्युनिस्टांनी टाकले माप!!, अशा तिखट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची अक्षरश: चिरफाड केली. उत्तर प्रदेशातील सहारनपूर मध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे पुरते वाभाडे काढले, इतकेच नाहीतर त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांना देखील सोडले नाही. Muslim League imprint on Congress manifesto
काँग्रेसने काल प्रसिद्ध केलेल्या जाहीर करण्यात 25 गॅरंटी दिल्या, पण त्याचबरोबर मोदी सरकारने सुरू केलेली सैन्य भरतीची अग्निवीर योजना रद्द करण्याचे आश्वासन दिले. सीएए आणि एनआरसी कायदे रद्द करून त्यांच्या ऐवजी नवीन कायदे आणण्याचे आश्वासन दिले. आत्मनिर्भर भारत योजनेत बदल करण्याचे सूतोवाच केले. पण जम्मू – काश्मीर मधून हटविलेले 370 कलम पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देण्याची हिंमत काँग्रेसने आपले जाहीरनाम्यात केली नाही.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने कालच 5 स्तंभांवर आधारित 25 गॅरेंटींचे जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण त्या संपूर्ण जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. कारण त्यांना देशात अग्निवीर योजना बंद करायची आहे. शेजारच्या देशातून आलेले हिंदू, दलित, जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चनांना नागरिकत्व देणारे सीएए आणि एनआरसी हे कायदे रद्द करायचे आहेत. काँग्रेसला संपूर्ण देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिम लीग सारखी सल्तानतीची राजवट चालवायची आहे. त्यामुळेच त्यांच्या जाहीरनाम्यावर सगळी मुस्लिम लीगची छाप आहे. उरलेल्या पानांवर कम्युनिस्टांनी आपले माप टाकले आहे. कारण त्यांना देश संरक्षण दृष्ट्या सक्षम करायचा नाही म्हणून त्यांचा आत्मनिर्भर भारताला विरोध आहे.
रिलाँच केलेला सिनेमा फ्लॉप
काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे जाहीर न गेलेले उमेदवार राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर शरसंधान साधताना मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशात दो लडकों का सिनेमा 2019 मध्ये त्यांनी रिलीज करून पाहिला, पण तो सिनेमा फ्लॉप गेला. आता त्याच सिनेमाचे 2024 मध्ये त्यांनी रीलॉन्चिंग चालवले आहे. ते हिरो बदलत नाहीत, ते व्हिलन बदलत नाहीत, ते डायरेक्टर पण बदलत नाहीत. ते जुनाच सिनेमा नव्याने काढतात. आता आधीचा फ्लॉप झालेला सिनेमा नव्याने काढून तो सुपरहिट कसा होईल??, असा खोचक सवाल मोदींनी केला.
Muslim League imprint on Congress manifesto
महत्वाच्या बातम्या
- आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे
- अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी अडखळली; उत्तर प्रदेशात एक दोन नव्हे, तब्बल 9 उमेदवार बदलण्याची वेळ!!
- कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह