भारतातल्या प्रत्येक मशिदीखाली शिवमंदिर शोधायला जाऊ नका त्याचबरोबर राम मंदिर निर्माणच्या आंदोलनासारखे एखाद्या आंदोलन करून कोणी नेता व्हायचा प्रयत्न करत असेल, तर आता तसे होणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातल्या व्याख्यानमालेत केले. सरसंघचालकांच्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटले. सरसंघचालकांनी हे वक्तव्य करून जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावल्याचे “जावई शोध” अनेकांनी लावले. त्यामध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि मुस्लिम नेत्यांचा समावेश आहे.
मोहन भागवत यांना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह किंवा योगी आदित्यनाथ यांना काही सुनवायचेच असेल, तर काँग्रेस, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी किंवा मुस्लिम नेत्यांच्या परवानगीची किंवा त्यांच्या अनुमोदनाची खरंतर गरजच नाही. देशातल्या इतर नागरिकांप्रमाणे मोहन भागवत हे देखील त्यांची मते व्यक्त करण्यासाठी संविधानिक दृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम आहेत. त्याला अनुसरूनच त्यांनी पुण्यातल्या व्याख्यानमालेत भारतातल्या शांतता आणि सौहार्दासाठी आपल्याला काय करता येईल??, याविषयी विवेचन केले. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यातला एक मुद्दा म्हणजे, राम मंदिर उभे राहिले. त्यासाठी आंदोलन झाले होते. आता तशा आंदोलनाची गरज नाही. त्यामुळे आता कुठल्या मंदिरासाठी कोणी आंदोलन करत असेल, तर त्यातून कोणी नेता होणार नाही, हा होता. याचा अर्थ मोहन भागवतांनी मोदी, शाह किंवा योगी आदित्यनाथ यांना सुनावले, असा बिलकुल होत नाही. उलट त्यांनी हिंदू समाज, मुस्लिम समाज किंबहुना समस्त भारतीय समाज याला उद्देशून मार्गदर्शन केले. पण काँग्रेस समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पार्टी आणि काही मुस्लिम नेत्यांनी मात्र मोहन भागवतांचे ते अर्धेच फक्त वक्तव्य उचलून धरून हिंदू समाजाला मोहन भागवतांचे तरी ऐकावे, असा उपदेश करणे चालविले.
पण मोहन भागवतांनी आपल्या संपूर्ण व्याख्यानात तेवढेच उद्गार काढले असे अजिबात घडले नाही. किंबहुना त्यांनी संघाच्या पंचसूत्री विषयी विशेष भाष्य केले. नागरी कर्तव्यांसंदर्भात मोहन भागवत बोलले. त्याचवेळी त्यांनी कुणी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून बळजबरीने मतांतर करायचा प्रयत्न करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, असा गंभीर इशारा व्याख्यानात दिला. पण माध्यमांनी राजकीय चतुराईने त्यांचे हे मत “हायलाईट” केले नाही. मोहन भागवतांनी फक्त मोदी, शाह आणि योगींना सुनावल्याचे “सिलेक्टिव्ह” वक्तव्यच “हायलाईट” केले. त्यामुळे काँग्रेस, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि मुस्लिम नेत्यांनी उतावीळपणे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
– भागवतांची इतर मते मान्य आहेत का??
मोहन भागवतांची समान नागरी कायदा विषयीची मते, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड संदर्भातली मते, वक्फ बोर्डासंदर्भातील मते देखील जगजाहीर आहेत. त्याविषयी मात्र माध्यमांनी किंवा वर उल्लेख केलेल्या कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी किंवा मुस्लिम नेत्यांनी भागवतांना पाठिंबा दिला नाही. किंवा त्यांची मते उचलूनही धरली नाहीत. मोहन भागवतांच्या अर्ध्या वक्तव्यातून संबंधित नेते “पिवळे” झाले आणि म्हणूनच त्यांनी अर्धवट वक्तव्याच्या आधारे प्रतिक्रिया व्यक्त करून आपले अर्धे ज्ञान प्रकट केले!!
Muslim leaders praised half statement of Mohan bhagwat
महत्वाच्या बातम्या
- Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
- Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू
- Shivraj Singh Chouhan : ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याच्या लायक नाहीत’, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल!
- Good News : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार!