• Download App
    मुस्लिमांना सैन्यात 30 % कोटा देण्याची नितीशकुमारांच्या मुस्लिम नेत्याची मागणी; नितीशकुमार मात्र नाराज!! Muslim leader demands Nitish Kumar to give 30% quota to Muslims

    मुस्लिमांना सैन्यात 30 % कोटा देण्याची नितीशकुमारांच्या मुस्लिम नेत्याची मागणी; नितीशकुमार मात्र नाराज!!

    वृत्तसंस्था

    पाटणा : मुस्लिमांना भारतीय सैन्य दलामध्ये 30 % कोटा देण्याची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे मुस्लिम नेते गुलाम रसूल बलयावी यांनी केली. त्यांच्या या मागणीमुळे बिहारच्या राजकारणात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली असून नितीशकुमार यांनी बलयावी यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. Muslim leader demands Nitish Kumar to give 30% quota to Muslims

    भारतीय सैन्य दलामध्ये कोटा सिस्टीम म्हणावी आणि भारतीय मुस्लिमांना 30 % कोटा द्यावा, अशी मागणी गुलाम रसूल बलयावी यांनी एका कार्यक्रमात केली होती. पाकिस्तानने अणुबाँब बनवल्यानंतर भारतात एपीजे अब्दुल कलाम या मुस्लिम भूमिपुत्राने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतंत्र बॉम्ब बनवल्याचे अजब वक्तव्य बलयावी यांनी केले आहे.

    बलयावी यांचे हे वक्तव्य आल्यानंतर भाजप सह बाकीच्या विरोधकांनी संयुक्त जनता दल भारतीय सैन्यात फूट पाडत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी ताबडतोब बचावात्मक भूमिका घेऊन मुस्लिमांना 30 % कोटा मागण्याच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली. काही लोकांना जास्त बोलण्याची सवय असते. त्यातून ते बोलून जातात. पण संयुक्त जनता दलाची मुस्लिम कोट्याची अशी कोणतीही मागणी नाही. बलयावी यांनी असे विधान का केले?, याविषयी स्पष्टीकरण मागू असे नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    पण भारतीय सैन्य दलात मुस्लिम कोटा हा विषय काढल्याने संयुक्त जनता दल पक्षात राजकीयदृष्ट्या वेगळीच खळबळ माजली आहे. बिहारमध्ये पक्षाचा राजकीय पाया आधीच संकोचत असताना पक्षाच्या मुस्लिम नेत्याकडून सैन्यदलात कोटा मागण्याची मागण्याचे वक्तव्य आल्याने पक्षाचा सामाजिक पाया देखील धोक्यात आल्याची भीती नितीशकुमार यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी बलयावी यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्याची भूमिका घेतली आहे.

    Muslim leader demands Nitish Kumar to give 30% quota to Muslims

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट