वसतिगृहाच्या खोलीत फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली
विशेष प्रतिनिधी
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणाची आग अजूनही थंडावली नाही, तेच आता मुर्शिदाबादच्या ( Murshidabad ) वसतिगृहाच्या खोलीत फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
तौहीद करीम असे या मृताचे नाव आहे. हा विद्यार्थी रघुनाथपूर येथील एका खासगी फार्मसी कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो मालदा येथील इंग्शिल बाजार येथील रहिवासी होता. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. आधी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह वसतिगृहाच्या खोलीतील पंख्याला लटकवण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Body of a pharmacy student was found in Murshidabad
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!