विशेष प्रतिनिधी
बंगळूर – कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र मुर्डेश्वर देवस्थानावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली आहे. ‘इसिस’ संघटनेच्या ‘द व्हॉइस ऑफ हिंद’ या पत्रकात मुर्डेश्वर येथील भव्य शिवमूर्ती भग्नस्वरूपात प्रसिद्ध केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे देवस्थानला असलेला संभाव्य धोका विचारात घेऊन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.Murdeshwar is on radar of terrorist
अरबी समुद्रापासून जवळच असलेले मुर्डेश्वर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भटकळ तालुक्यातील मुर्डेश्वर येथील भगवान शिवमूर्ती भग्न स्थितीत असलेला फोटो मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर तो फोटो व्हायरल झाली आहे.
अन्सुल सक्सेनाने हा फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर ‘द व्हॉइस ऑफ हिंद’ या इसिस मासिकाच्या मुखपृष्ठासह पोस्ट केला आहे. ज्यावर ‘टाइम टू ब्रेक दी फॉल्स गॉड्स’ असे लिहिले आहे. भव्य शिवमूर्ती भग्नस्वरूपात दाखवून फोटोत ‘इसिस’चा झेंडाही दिसतो. सोशल नेटवर्किंग साइटवर फोटो शेअर करणाऱ्या अन्सुल सक्सेनानेही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
भटकळचा जाफरी जवाहर दामूदी हा ‘इसिस’ मोहीम मासिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ हिंद’ या ऑनलाइन मासिकाच्या निर्मिती व प्रसारामध्ये सक्रिय आरोपी आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलिसांच्या पथकाने जाफरीला २०२० मध्ये अटक केली होती.
Murdeshwar is on radar of terrorist
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-इस्रायल संबंध बळकट राहणे महत्त्वाचे; इस्रायल कौन्सुल जनरल शोशानि यांची सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट
- संविधान दिनी बिहारमध्ये “दारू बंद”ची शपथ; नितीश कुमार चालवणार काँग्रेसने सोडलेला गांधीजींचा वारसा!!
- ST strike : सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो पण संप मागे घ्या-अनिल परबांच आवाहन
- समांथा झळकणार ‘द अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात