वृत्तसंस्था
कोलकाता – बांगलादेशात दुर्गापूजा विसर्जनात धर्मांध जमावाने तीन हिंदूंची हत्या केली. त्याचा जगभरातून तीव्र निषेध होत असताना इस्कॉन मंदिरांच्या प्रतिनिधींनी आज सायंकाळी कोलकात्यात बांगलादेशाच्या हाय कमिशरनेटसमोर भजन करून तिथल्या सरकारचा निषेध केला.Murder of Hindus in Bangladesh during Durga Puja immersion
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याशी थेट बोलून बांगलादेशातील हिंदू समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा इस्क़ॉनने व्यक्त केली आहे.
बांगलादेशात दुर्गापूजा विसर्जनाच्या दिवशी धर्मांध जमावाने तीन हिंदूंची निर्घृण हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नौखालीत दुर्गापूजा मंडपाचा विध्वंस केला. याचा निषेध जगभरातून करण्यात आला. बांगलादेशाच्या शेख हसीना वाजेद सरकारने या हिंसाचाराला दोषी असणाऱ्यांना शिक्षा देण्याची घोषणा देखील केली. पण अद्याप अटकेची कायदेशीर कारवाई झालेली नाही.
याचा निषेध म्हणून कोलकात्यातील इस्कॉन मंदिराच्या प्रतिनिधींनी आणि हिंदू समाजाने एकत्र येऊन कोलकात्याच्या डेप्युटी हाय कमिशरनेटपुढे भजन आंदोलन केले. त्यामध्ये हजारो हिंदू मेणबत्या घेऊन सहभागी झाले होते.
Murder of Hindus in Bangladesh during Durga Puja immersion
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने टाकला छापा
- टोपे साहेब अभिनंदन ; फॉर्म भरताना नागपूर मात्र परीक्षेला सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम केंद्र , आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो
- सोशल मीडियावरद्वारे न बोलण्याचे सोनियांचे निर्देश सिद्धूंनी डावलले, 13 मुद्द्यांवर लिहिले पत्र, सोशल मीडियावर केले पोस्ट
- सोलापूरातून किरीट सोमय्यांचे आता थेट पवार कुटुंबीयांना आव्हान; पवार काय प्रत्युत्तर देणार?