• Download App
    लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलीची हत्या; उर्वशी वैष्णवच्या हत्येपूर्वी जिम ट्रेनर रियाज खानचे 3 महिलांशी विवाह Murder of a Hindu girl by tricking her into the trap of love jihad

    लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलीची हत्या; उर्वशी वैष्णवच्या हत्येपूर्वी जिम ट्रेनर रियाज खानचे 3 महिलांशी विवाह

    प्रतिनिधी

    मुंबई : ब्रँडेड सँडलच्या मागावरून ज्या मुलीच्या हत्येचा शोध लागला, त्या मुलीचे नाव उर्वशी वैष्णव असून जिम ट्रेनर रियाज खानने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नाही तर उर्वशी वैष्णव तिच्या हत्येपूर्वी रियाज खान याची 3 महिलांबरोबर लग्ने झाल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. Murder of a Hindu girl by tricking her into the trap of love jihad

    लव्ह जिहाद मधून श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब अमिन पूनावाला याचे प्रकरण ताजे असतानाच पनवेल मधले लव्ह जिहादचेच प्रकरण उघड झाले आहे. उर्वशी वैष्णव हिची हत्या करणारा आरोपी रियाज खान हा आधीच विवाहित होता. त्याला 3 बायका होत्या. तरीही तो उर्वशी वैष्णवीच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये होता. उर्वशीने लग्नाचा आग्रह धरल्यामुळे तिची हत्या केल्याची माहिती रियाज खान याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपी रियाज खान आणि आणि त्याच्या साथीदार डिलिव्हरी बॉय इम्रान शेख यांना अटक केली आहे. पोलिसांनी मृताच्या ब्रँडेड सँडलच्या मदतीने खुनाच्या गुन्ह्याची उकल केली.

     काय आहे प्रकरण?

    राजस्थानमधील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय उर्वशीचा मृतदेह धामणी गावाजवळील गढी नदीत आढळून आला होता. उर्वशीचा गळा आवळून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी उर्वशीच्या ब्रँडेड सँडलवरून आरोपीचा शोध घेतला. आरोपी रियाज खान याला आधीच 3 बायका असल्याची माहिती आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी याबाबत सांगितले, की पोलीसांनी मुख्य आरोपी, देवनारचा जिम ट्रेनर रियाझ खान आणि कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा त्याचा साथीदार इम्रान शेख याला अटक केली आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या ब्रँडेड सँडलच्या मदतीने पीडितेची ओळख पटवण्यात आणि आरोपीचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी झाले.


    Love Jihad : लव्ह जिहाद बद्दल मुस्लिम उच्चपदस्थांचे उफराटे बोल; एस. वाय. कुरेशी गयासुद्दीन शेख यांचा “नवा बुद्धिवादी पॅटर्न”!!


    पोलिसांनी नवी मुंबईतील सर्व पादत्राणांच्या दुकानात चौकशी केली आणि गेल्या आठवडाभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. वाशीतील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती 8 दिवसांपूर्वी दिसली होती. ती एका उंच माणसासोबत होती. तो बॉडी बिल्डरसारखा दिसत होता. त्या आधारे पोलीसांनी वाशी आणि कोपरखैरणे येथील सर्व जिम तपासल्या. रियाझ खान हा कोपरखैरणेच्या जिममध्ये ट्रेनर होता. त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली.

    17 डिसेंबरला सापळा रचून रियाज खानला देवनार येथून अटक केल्यानंतर त्याने उर्वशीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या उर्वशीसोबत रियाज हा रिलेशनशिपमध्ये होता आणि ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी मागे लागली होती. मात्र, त्याला लग्न करायचे नव्हते. कारण त्याला आधीच 3 बायका होत्या. उर्वशी चा लग्नाचा तगादा चुकवण्यासाठी रियाज खानने गळा दाबून तिची हत्या केली.

    Murder of a Hindu girl by tricking her into the trap of love jihad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!