• Download App
    Mumbai soldier पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद;

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Mumbai soldier

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mumbai soldier भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उडवले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, त्याला देखील भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या युद्धात मुंबईच्या जावानाला वीरमरण आले आहे. पाकिस्तानच्या या कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत.Mumbai soldier

    पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले आहेत. यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक यांना उरी सेक्टरमध्ये, तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



     

    उरीमध्ये लढताना आले वीरमरण

    मुंबई येथील मुरली नाईक हे दिनांक 9 मे रोजी पहाटे एलओसी (LOC) येथे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झाले आहेत. त्यांचे वय केवळ 23 वर्ष होते. मुंबई येथील घाटकोपर येथे त्यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावले आहे. मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. आपला मुलगा शहीद झाल्याचे समजताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला. मुरली नाईक यांचे वडिल घाटकोपर भागात मजुरीचे काम करतात.

    पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील सध्या चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहणारे ते 2022 मध्ये भारतीय सेना दलामध्ये नोकरीस लागले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती, ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते, त्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान्यांशी लढताना जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत.

    मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वाहिली श्रद्धांजली

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ट्विट करत शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे ट्वविट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.

    झोपडपट्टी पुनर्विकासात त्यांचे घर गेले

    दरम्यान, मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

    Mumbai soldier martyred while fighting against Pakistan; Murali Naik martyred while fighting in Uri

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ganga Expressway : पाकिस्तान युद्धात गंगा एक्सप्रेसवे गेम चेंजर; राफेलपासून हरक्यूलिस उतरले

    Terrorist Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वुर राणा 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत; सुरक्षेच्या कारणास्तव एक दिवस आधी हजेरी

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली