• Download App
    Major Accident Averted at Mumbai Airport as Air India and IndiGo Planes Collide मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची धडक, मोठा अपघात टळला, डीजीसीएकडून चौकशीचे आदेश

    Major Accident : मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची धडक, मोठा अपघात टळला, डीजीसीएकडून चौकशीचे आदेश

    Major Accident

    वृत्तसंस्था

    मुंबई : Major Accident मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांच्या पंखांची धडक झाली असून यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेने विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.Major Accident

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गर्दीच्या वेळी टॅक्सीवेवर घडली, ज्यात प्रवाशांनी भरलेल्या दोन लहान विमानांचा समावेश होता. विमानतळ सूत्रांनुसार, गर्दीच्या धावपट्टीवरून मार्गक्रमण करत असताना दोन्ही विमानांचे पंखांचे टोक एकमेकांना घासले गेले. यात पंखांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले आहे.Major Accident



    अधिकची माहिती अशी की, यातील एअर इंडिया AI 2732 हे विमान मुंबईहून कोईम्बतूरसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत होते. विमान प्रस्थानासाठी आपल्या गेटवरून ते पुढे जात होते. तर इंडिगो 6E791 हे विमान हैदराबादहून आले होते. सुरक्षित लँडिंगनंतर विमान आपल्या निर्धारित पार्किंग बेकडे जात होते. याच वेळी दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले.

    डीजीसीएकडून चौकशीचे आदेश

    दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची दखल घेतली असून, औपचारिक चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही विमान कंपन्यांनी नियामक प्राधिकरणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे दुजोरा दिला आहे.

    Major Accident Averted at Mumbai Airport as Air India and IndiGo Planes Collide

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US Trade Deal: अमेरिका व्यापार करारावर केंद्राने म्हटले- याचा अभियांत्रिकी, कापड, सागरी वस्तू क्षेत्राला फायला होईल, दोन्ही देश लवकरच संयुक्त निवेदने जारी करतील

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- बेकायदेशीर बांगलादेशी-रोहिंग्यांची ओळख पटवणे सरकारची जबाबदारी; लोक फक्त अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतात

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- जातगणना फक्त स्वयं-घोषणापत्रावर आधारित नसावी, पडताळणी आवश्यक; केंद्राला विचार करण्यास सांगितले