• Download App
    मुलायमसिंहांचे साडू, काँग्रेसच्या पोस्टर गर्लचा भाजपमध्ये प्रवेश, प्रमोद गुप्ता म्हणाले- अखिलेशने नेताजींना कैदेत ठेवलंय । Mulayam Singhs brother in law pramod gupta and Congress poster girl priyanka Morya joins BJP, Gupta says Akhilesh has imprisoned Netaji

    मुलायमसिंहांचे साडू, काँग्रेसच्या पोस्टर गर्लचा भाजपमध्ये प्रवेश, प्रमोद गुप्ता म्हणाले- अखिलेशने नेताजींना कैदेत ठेवलंय

    उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांतील चुरस अतिशय वाढली आहे. राज्यात सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात आरपारची लढत आहे. अलीकडेच, तीन मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर, आता भाजपने अखिलेश यादव यांच्यावर पलटवार करत त्यांच्या कुटुंबात फूट पाडली आहे. Mulayam Singhs brother in law pramod gupta and Congress poster girl priyanka Morya joins BJP, Gupta says Akhilesh has imprisoned Netaji


    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांतील चुरस अतिशय वाढली आहे. राज्यात सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात आरपारची लढत आहे. अलीकडेच, तीन मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर, आता भाजपने अखिलेश यादव यांच्यावर पलटवार करत त्यांच्या कुटुंबात फूट पाडली आहे. काल मुलायम सिंह यादव यांची धाकटी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आज मुलायम यांचे साडू प्रमोद गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    नेताजींना कैद केलंय – प्रमोद गुप्ता

    प्रमोद गुप्ता यांनी आज लखनौमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. प्रमोद गुप्त हे समाजवादी पक्षाचे माजी आमदार आहेत. प्रमोद गुप्ता यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी नेत्या प्रियांका मौर्य यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पत्रकार परिषदेत प्रमोद गुप्ता यांनी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नेताजींना कैदेत ठेवले असून त्यांना कुठेही जाऊ दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

    समाजवादी नसलेल्यांना पक्षात प्राधान्य – प्रमोद गुप्ता

    प्रमोद गुप्ता म्हणाले, “पक्षात समाजवादी नसलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. मुलायमसिंह यादव यांना शिव्या देणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. खुद्द मुलायम यांचाही आदर केला जात नाही. 22 नोव्हेंबरला मुलायम यांच्या वाढदिवशी त्यांचा माईक कसा हिसकावण्यात आला ते आम्ही पाहिले.”

    १० मार्चला यूपी निवडणुकीचा निकाल

    10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.

    Mulayam Singhs brother in law pramod gupta and Congress poster girl priyanka Morya joins BJP, Gupta says Akhilesh has imprisoned Netaji

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!