विशेष प्रतिनिधी
मुलायम सिंह यादव यांची राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेश आणि देशासाठी महत्त्वाची राहिली होती पण त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे 1990 च्या दशकात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कारसेवकांवर दिलेले गोळीबाराचे आदेश त्यामुळे गमवावी लागलेली सत्ता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर कायमचा लागलेला काळा डाग!!, हे त्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. Mulayam Singh Yadav : Orders to fire on Karsevaks
मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्याबरोबर आपले संबंध व्यक्तिगत पातळीवर कसे मधुर होते याचे वर्णन केले आहे. पण त्याच वेळी मुलायम सिंह यादव यांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते हे विसरून चालणार नाही.
मुलायम सिंह यादव पहिल्यांदा 1989 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी केंद्रात राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेस सरकार जाऊन जनता दलाचे नेते विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार आले होते. ते भाजप आणि कम्युनिस्ट या दोघांच्या पाठिंब्यावर उभे होते. त्याचवेळी संपूर्ण देशात राम जन्मभूमी आंदोलनाने जोर पकडला होता. अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्यासाठी तेथे कारसेवा करण्याची योजना विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आखली होती. ही योजना आपल्या सत्तेला सुरुंग लावेल या भीतीने मुलायम सिंह यादव यांनी जी राजकीय पावले उचलली, त्याचीच परिणीती प्रत्यक्ष अयोध्येत कारसेवकांवर थेट गोळीबार करण्यात झाली होती.
राम मंदिर आंदोलन जोर पकडत असताना कारण सेवकांची अयोध्येत प्रचंड गर्दी जमली होती. तेथे हजारो कारसेवक बाबरी मशिदीवर चालून जाण्यासाठी सिद्ध होते. पण मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी बाबरी मशीद वाचविण्यासाठी कारसेवकांवर गोळ्या चालवण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना दिले. त्यानुसार 30 ऑक्टोबर 1990 या दिवशी पोलिसांनी पहिला गोळीबार केला. त्यामध्ये 5 कारसेवक हुतात्मा झाले होते. पण या गोळीबारामुळे राम मंदिर आंदोलन थांबण्याऐवजी अधिकच तीव्र झाले. देशभर संतापाचा माहोल उसळला. कारसेवकांच्या भावना जास्त तीव्र झाल्या आणि हजारो कारसेवकांचा जथा अयोध्येत पोहोचला. तेथे 2 नोव्हेंबर 1990 रोजी हजारो कारसेवक हनुमान गढीच्या दिशेने निघाले असताना मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा गोळीबाराचे आदेश दिले. यावेळी पोलिसांनी कारसेवकांवर समोरून गोळीबार केला. यामध्ये अक्षरशः शेकडो कारसेवक हुतात्मा झाले. यात कोलकत्त्याचे कोठारी बंधू रामकुमार आणि शरद कुमार यांना हौतात्म्य पत्करावे लागले. कारसेवकांच्या मृत्यूचा आकडा मुलायम सिंह सरकारने लपवला. 10 – 12 कारसेवक मृत्युमुखी पडल्याचा आकडा सांगितला. पण प्रत्यक्षात शेकडो कारसेवकांना या गोळीबारात हौतात्म्य पत्करावे लागले होते.
मुलायम सिंह यांच्या गोळीबाराच्या आदेशामुळे आधीच त्यांच्या विरोधात देशभर वातावरण तयार झाले होते. त्याचे लोण उत्तर प्रदेश मध्ये देखील पोहोचले आणि 1991 मध्ये मुलायम सिंह यादव यांना विधानसभा निवडणुकीत त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांची सत्ता गेली आणि त्यानंतर भाजपचे नेते कल्याणसह मुख्यमंत्री बनले. मुलायम सिंह यादव यांनी 1991 मध्ये सत्ता गमावली त्यानंतर ते पुन्हा दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील झाले, पण त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या कारकिर्दीत त्यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचा दिलेला आदेश उत्तर प्रदेशातली आणि भारतातली जनता कधीही विसरली नाही. त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरचा तो मोठा डाग कायम राहिला. बाबरी मशीद वाचवण्यासाठी आपल्याकडे गोळीबार करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असे समर्थन त्यावेळी मुलायम सिंह यादव यांनी केले होते. त्यामुळेच त्या काळात मुलायम सिंह यांची संभावना “मुल्ला मुल्लायम” अशी झाली. उत्तर प्रदेशातील राजकारणामुळे त्यांची ही ओळख अनेक वर्ष त्यांना चिकटली होती. 2014 नंतर मोदी सरकारला अनुकूल अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांची ही ओळख थोडीफार बदलली.
1991 च्या निवडणुकीत विधानसभेच्या 425 जागांपैकी भाजपा 221, जनता दल 92, सीटों कॉंग्रेस 46, समाजवादी जनता पार्टी 34 जागांवर विजयी झाले होते. पण या पराभवापेक्षा राजकीय कारकीर्दीवरचा डाग मोठा ठरला.
Mulayam Singh Yadav : Orders to fire on Karsevaks
महत्वाच्या बातम्या
- गदा, तलवार आणि तुतारी – शिंदे गटाची तयारी : निवडणूक आयोगाला देणार 3 नवी नावे आणि 3 नवे चिन्ह, अंधेरी पोटनिवडणुकीत यापैकीच वापरणार
- 2024साठी भाजपचा मेगा प्लॅन : 2019 मध्ये गमावलेल्या जागा लक्ष्य, 40 जागांवर मोदी, तर 104 जागांवर नड्डा-शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सभा
- द फोकस एक्सप्लेनर : हिंदू देवी-देवतांचा अपमान, वाद आणि केजरींच्या मंत्र्याचा राजीनामा, वाचा सविस्तर
- WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी