• Download App
    Mulaayam Sing's daughter in law may join BJP Earthquake in Samjwadi Party

    मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून भाजपमध्ये? ;समाजवादी पक्षाला हादरा

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : समाजवादी पक्षाला आज मोठा झटका बसू शकतो. तीन कॅबिनेट मंत्री आणि आठ आमदारांना आपल्या गोटात सामील करून भाजपला धक्का देणाऱ्या समाजवादी पक्षासाठी वाईट बातमी आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव ( Aparna Yadav) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात, अशी बातमी आहे. याची पुष्टी झाली नसली तरी सोशल मीडियावर त्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. Mulaayam Sing’s daughter in law may join BJP Earthquake in Samjwadi Party



    अपर्णा यांनी 2017 ची निवडणूक लखनऊ कँटमधून लढवली होती, तेव्हा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. अपर्णा सातत्याने नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत आहेत.

    सपा संस्थापक मुलायम सिंह यांचे जवळचे मित्र हरी ओम यादव यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अपर्णा यादव या मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव (Pratik Yadav) यांच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांनी 2017 ची निवडणूक लखनऊ कँट मतदारसंघातून लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला.

    आता भाजप अपर्णा यादव यांना लखनऊच्या कँट विधानसभेतून उमेदवार बनवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि अपर्णा यादव यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर चर्चेचा बाजार तापला आहे.

    Mulaayam Sing’s daughter in law may join BJP Earthquake in Samjwadi Party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज