• Download App
    मुकेश अंबानींची २२ जानेवारीसाठी मोठी घोषणा, रिलायन्स इंडस्ट्रीज...|Mukesh Ambanis big announcement for January 22 Reliance Industries delclerd holiday in all office

    मुकेश अंबानींची २२ जानेवारीसाठी मोठी घोषणा, रिलायन्स इंडस्ट्रीज…

    22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याआधीच शुक्रवारी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी जाहीर केले की, राममंदिराच्या अभिषेकसाठी 22 जानेवारीला देशातील सर्व कार्यालयांमध्ये सुट्टी असेल.Mukesh Ambanis big announcement for January 22 Reliance Industries delclerd holiday in all office

    यापूर्वी केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनेही २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही या निमित्ताने अर्धा दिवस सुट्टी असेल. त्याच वेळी, आतापर्यंत सात राज्यांमध्ये अर्धा दिवस जाहीर करण्यात आला आहे.



    उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारीला देशभरात दीपावली साजरी करावी, घरोघरी दीपोत्सव साजरा करण्यात यावा. प्रत्येक घरात रामज्योत प्रज्ज्वलित करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

    Mukesh Ambanis big announcement for January 22 Reliance Industries delclerd holiday in all office

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील