• Download App
    मुकेश अंबानी MMRDAचे 4381 कोटींचे थकबाकीदार; आणखी 5 व्यावसायिकांनी 5818 कोटी थकवले|Mukesh Ambani MMRDA arrears of 4381 crores; 5818 crores were spent by another 5 professionals

    मुकेश अंबानी MMRDAचे 4381 कोटींचे थकबाकीदार; आणखी 5 व्यावसायिकांनी 5818 कोटी थकवले

    वृत्तसंस्था

    मुंबई : श्रीमंतीत जगात 11 व्या तर भारतात प्रथम क्रमांकावर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांनी MMRDA चे 4381 कोटी थकविले आहेत. अंबानी यांच्यासहित अन्य 5 थकबाकीदार आहेत. त्यांची एकूण थकबाकी 5,818 कोटी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना MMRDA प्रशासनाने दिली आहे.Mukesh Ambani MMRDA arrears of 4381 crores; 5818 crores were spent by another 5 professionals

    आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी MMRDA प्रशासनाकडे थकबाकीदार यांना दिलेली नोटीस आणि थकबाकीची माहिती विचारली होती. MMRDA प्रशासनाने अनिल गलगली यांना कळविले की, मेसर्स रिलायंस, नमन हॉटेल, अंबानी फाउंडेशन, आयएनएस, रघुलीला बिल्डर्स असे 5 थकबाकीदार आहेत. यांचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. या सर्व थकबाकीदारांना दिनांक 12 सप्टेंबर 2017 मध्ये नोटीस देण्यात आली होती.



    सर्वांत श्रीमंत मुकेश अंबानी 4381 कोटींचे थकबाकीदार

    श्रीमंतीत जगात 11 व्या क्रमांकाचे उद्योगपती मुकेश अंबानीची कंपनी मेसर्स रिलायंस ही कंपनी सर्वांत मोठी थकबाकीदार आहे. ज्या जियो कॅन्व्हेंशन केंद्रात ( भूखंड क्रमांक C 64 ) हजारों कोटींचा खर्च करत लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे, त्या लीज जमिनीची थकबाकी 4381.32 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम आहे.

    वन बीकेसीची ( भूखंड क्रमांक सी 66) थकबाकी आहे 1123.50 कोटी. मेसर्स रघुलीला बिल्डर्स असे थकबाकीदाराचे नाव आहे. मूलतः ही जमीन सुद्धा मेसर्स रिलायंसची होती. या प्रकरणात एमएमआरडीएला उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात ही सपशेल हार पत्करावी लागली. पण अतिरिक्त बिल्ट अप एरियाची थकबाकी 449.27 कोटी एमएमआरडीएला मिळण्याची शक्यता आहे. आयएनएसची ( भूखंड क्रमांक C 63) थकबाकी 181.35 कोटी रुपये आहे. अंबानी फाउंडेशनची ( भूखंड क्रमांक एसएफ 7 आणि 9 बी ) 8.15 कोटी रुपये थकबाकी आहे. तर नमन हॉटेल लिमिटेडची ( भूखंड क्रमांक C 58 आणि सी 59 ) 48.92 कोटी रुपये थकबाकी आहे.

    एमएमआरडीएकडून लीजवर जमीन घेतल्यावर 4 वर्षात ज्या प्रयोजनासाठी जमीन घेतली आहे, त्या अनुषंगाने बांधकाम पूर्ण नाही केल्यास दंड आकारला जातो. सीबीआय, आयकर विभाग आणि अन्य लीजधारकांनी प्रामाणिकपणाने दंड भरला आहे. अनिल गलगली यांच्या मते एमएमआरडीएने नेहमीच थकबाकीदारांवर मेहरबान राहिली आहे. अन्यथा भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार असतांनाही एकाही थकबाकीदारावर कठोर कारवाई करण्यात आली नाही. उलट नमन हॉटेलला पार्ट ओसी देण्यासाठी एमएमआरडीए आयुक्तांनी विशेष मेहरनजर दाखविली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा एमएमआरडीए तर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे.

    Mukesh Ambani MMRDA arrears of 4381 crores; 5818 crores were spent by another 5 professionals

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार