विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातली सत्ता जमाते इस्लामी आणि बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी यांनी हस्तगत केल्यानंतर तिथल्या सरकारचा चेहरा नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र याच दरम्यान बांगलादेशात हिंदू आणि बाकीच्या अल्पसंख्यांक समाजावर जमाती इस्लामीच्या गुंडांनी हल्ले केले त्यांच्या हत्या केल्या हजारो घरे आणि दुकाने पेटवून दिली हिंदू समाजात पूर्ण दहशत निर्माण केली त्यामुळे हिंदू समाज संतप्त होऊन त्याने ढाक्याच्या रस्त्या रस्त्यांवर निदर्शने केली. telephone call from Professor Muhammad Yunus
हिंदू समाज संतप्त झाला त्याचे पडसाद जगभर उमटले त्यामुळे बांगलादेशातले सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीत आले मोहम्मद युनूस यांच्याही प्रतिमेला धक्का पोहोचला. त्यामुळे आपली तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्यासाठी मोहम्मद युनूस यांनी तीनच दिवसांपूर्वी ढाकेश्वरी मंदिराला भेट देऊन तिथे दर्शन घेतले. बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार झाल्यानंतर त्यांना संरक्षणाचे आश्वासन दिले. परंतु आता बांगलादेशातला हिंदू देखील पूर्ण जागृत झाला असून त्याने त्या समाजाने ढाक्याच्या रस्त्यावर शक्तिप्रदर्शन केल्यानंतर मोहम्मद युनूस सरकारला जाग आली त्यांच्या गृहमंत्र्यांनी हिंदूंची हात जोडून माफी मागितली.
बांगलादेशातली कायदा सुव्यवस्था सुरळीत व्हायला सुरुवात झाली असली तरी आता जमाते इस्लामी आणि बांगलादेशी नॅशनॅलिस्ट पार्टीचे गुंड हिंदू समाजातील घटकांना फोन करून बांगलादेशात राहायचे असेल तर खंडणी द्या अशा धमक्या देत आहेत. हिंदू समाज घटकांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. आधीच हिंदू समाजावर झालेले अत्याचार आणि आता बांगलादेशात राहायचे असेल तर खंडणी द्या, असेमले धमकीचे फोन असले प्रकार मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत सुरू झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून बांगलादेशातल्या परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही देशादरम्यान चांगले संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून मोहम्मद युनूस यांच्या फोन संदर्भात माहिती दिली. मोहम्मद युनूस यांनी मोदींना तिथल्या हिंदू समाजाचे आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले. मात्र तिथल्या अल्पसंख्यांक विशेषतः हिंदू समाजाला मुस्लिम गुंडांचे खंडणीसाठी फोन येणे अद्याप थांबलेले नाही.
telephone call from Professor Muhammad Yunus
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!