• Download App
    Mughal A. Azam will hold feasts for "Prithviraj"; But the promotion of this "Prithviraj" will not work

    नेहरू / मोदी : मुघल ए आझम “पृथ्वीराजला” मेजवान्या चालतील; पण या “पृथ्वीराज”चे प्रमोशन चालणार नाही!!

    काश्मीर पंडितांच्या सध्या सुरू असलेल्या हत्याकांडाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधताना त्यांना सिनेमांचे प्रमोशन करताना काश्मिरी हिंदूंच्या दुःखाकडे बाहेर यायला वेळ कोठे आहे?, असे खोचक ट्विट केले आहे…
    Jawaharlal Nehru gave dinner party to Bollywood star prithviraj Kapoor but samrat prithviraj promoting irks rahul gandhi

    चला हरकत नाही… राहुल गांधी यांना सध्या परदेशात राहूनही काश्मिरी पंडितांचे दुःख आठवले हेही नसे थोडके… पण काश्मिरी पंडितांचे दुःख आठवताना राहुल गांधींनी या खोचकपणे “सिनेमांचे प्रमोशन” हा विषय मांडला आहे, त्यावर मात्र राहुल गांधी यांना काही विशिष्ट आठवण करून देणे भाग आहे!!

    राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांनी “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाचे प्रमोशन करणे आवडलेले नाही. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी “सम्राट पृथ्वीराज” सिनेमा पाहणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सम्राट पृथ्वीराज सिनेमाला टॅक्स फ्री करणे हे देखील आवडले नाही आणि त्या रागातूनच राहुल गांधींनी सिनेमाचे प्रमोशन करणाऱ्या पंतप्रधानांना काश्मिरी पंडितांच्या दुःखाकडे पाहायला वेळ नाही, असे ट्विट केले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमाचे प्रमोशन केले हे खरेच. ते नाकारण्यात मतलब नाही. नाकारण्याचे काही कारण नाही. पण मोदींसारख्या पंतप्रधान जर एखाद्या सिनेमाचे प्रमोशन करणे गैर असेल, तर सिनेमाच्या अख्ख्या 60 जणांच्या टीमला पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलवून सरकारी खर्चाने त्यांना मेजवानी देणे आणि नंतर स्वतः पंतप्रधानांचे निवासस्थान फिरुन दाखवणे हे गैर नाही का??… पण या मेजवानीवर राहुल गांधींनी किंवा अन्य कोणी कधी टीका केल्याचे दाखले नाहीत… पण ही मेजवानी नेमकी दिली कुणी?? आणि कोणाला??… तर याचे उत्तर आहे ही मेजवानी दिली, पृथ्वीराज कपूर यांच्या 60 जणांच्या सिनेमाच्या टीमला आणि ती दिली दस्तुरखुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी!! आपले निवासस्थान तीन मूर्ती भवन येथे!! याचा दाखला चरित्रकार आणि प्रख्यात पत्रकार रशिद किडवाई यांच्या पुस्तकात मिळतो. हेच ते पृथ्वीराज कपूर आहेत, ज्यांनी के. आसिफ यांचा मुघल – ए- आझम हा सिनेमा प्रचंड गाजवला होता!!

    पंडित जवारलाल नेहरू यांचे पृथ्वीराज कपूर यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्या प्रेमातूनच नेहरूंनी त्यांना राज्यसभेवर देखील नेमले होते. पृथ्वीराज कपूर हे बॉलीवूड मधले पहिले स्टार की ज्यांची नेहरूंनी राज्यसभेवर निवड केली होती. नेहरूंनी त्यांना एकदा एका सायंकाळी मेजवानीसाठी बोलवले होते. परंतु पृथ्वीराज कपूर गेले नाहीत. नेहरूंनी आपल्या मित्राचा “संकेत” ओळखला आणि त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह सिनेमाच्या 60 जणांच्या अख्ख्या टीमला तीन मूर्ती भवन मध्ये मेजवानीसाठी पाचारण केले. मेजवानी दिली. त्यानंतर स्वतः नेहरूंनी आपले तीन मूर्ती भवन हे निवासस्थान या टीमला फिरून दाखवले.

    या मेजवानी आणि निवासस्थानाच्या प्रदर्शनात पंतप्रधानांचे सुमारे तीन तास मोडले… पण हरकत नाही… शेवटी “ते” पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि “हे” पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत!! “त्या” पंतप्रधानांनी “त्या पृथ्वीराजला” सरकारी खर्चाने मेजवानी दिली तर तो त्यांचा हक्क आहे!! पण “या” पंतप्रधानांच्या टीमने या “पृथ्वीराजाचे” थिएटर मध्ये जाऊन प्रमोशन करणे देखील गैर आहे हे मात्र नक्की!!, असाच राहुल गांधी यांचा होरा दिसतो आहे.

    बाकी सर्वच राजकीय नेत्यांप्रमाणे राहुल गांधी यांच्याकडे सिलेक्टीव्ह मेमरीचे डिव्हाइस आहे आणि या सिलेक्टीव्ह मेमरी मधूनच त्यांना “द काश्मीर फाईल्स” आणि “सम्राट पृथ्वीराज” या सिनेमांचे प्रमोशन दिसले आहे. पण आपल्या पणजोबांनी बॉलिवूडमधल्या किती स्टार्सना प्रमोट केले?? मेजवान्या दिल्या?? आपल्या परिवारातील किती लोकांच्या लोकांचा बॉलिवूडची खूप जवळचा संबंध होता??, हे मात्र राहुल गांधींना सध्या दिसत नाही… हरकत नाही… ज्याची त्याची सिलेक्टीव्ह मेमरी आणि ज्याचे त्याचे डिव्हाइस!!

    Jawaharlal Nehru gave dinner party to Bollywood star prithviraj Kapoor but samrat prithviraj promoting irks rahul gandhi

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य