• Download App
    एमएसएमई ने केली उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती, ७६ लाख उद्योगांना २.४२ लाख कोटींचे कर्ज, दोन कोटी तरुणांना मिळाला रोजगार|MSME launches economic revolution in Uttar Pradesh, 76 lakh industries get loans of Rs 2.42 lakh crore, 2 crore youth get jobs

    एमएसएमई ने केली उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती, ७६ लाख उद्योगांना २.४२ लाख कोटींचे कर्ज, दोन कोटी तरुणांना मिळाला रोजगार

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत ७६ लाख ७३ हजार ४८८ उद्योगांना तब्बल २ कोटी ४२ लाख २८ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. या उद्योगांतून दोन कोटींहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे.MSME launches economic revolution in Uttar Pradesh, 76 lakh industries get loans of Rs 2.42 lakh crore, 2 crore youth get jobs

    एमएसएमई क्षेत्रातील आश्चर्यकारक वाढ उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असताना एमएसएमई क्षेत्राकडे लक्षच देण्यात आले नाही. २०१६ -१७ मध्ये केवळ ६ लाख ३५ हजार ६८३ उद्योगांना २७ हजार २०२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते.



    मात्र, योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यावर एमएसएमई क्षेत्राला मुख्य अजेंड्यावर आणले. २०२०-२१ या वर्षात ३४ लाख ८० हजार ५९६ उद्योगांना ६३ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. या काळात योगी सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुुळे नव्याने सुरू झालेल्या १ लाख २५ हजार ४०८ उद्योगांना १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. देशातील एकूण एमएसएई उद्योगांपैकी १४ टक्के एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. कोविडच्य काळात योगी आदित्यनाथ सरकारने संकटात संधी समजून अनेक उद्योगांना मदत केली.

    सुमारे १.५ लाख नवीन उद्योग या काळात सुरू झाले. नोएडा आणि लगतच्या भागात सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झालीआहे. योगी आदित्यनाथ यांनी एमएसएमई पार्क उभाण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली आहे. राज्यातील पहिले एमएसएमई पार्क यमुना एक्सप्रेस वे डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या सेक्टर २९ आणि ३२ मध्ये बनले आहे.

    त्याचबरोबर आग्रा, कानपूर, मुरादाबाद, वाराणसी, आझमगढ आणि गोरखपूर येथेही एमएसएमई पार्कची उभारणी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत एमएसएमई क्षेत्रातून १.१४ लाख कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.

    केंद्र सरकारने एमएसएमई क्लस्टर विकसित करण्यासाठी ३८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांत एमएसएमई पार्कच्य माध्यमातून उद्योग सुरू आहेत. कानपूर, आग्रा येथे एमएसएमई उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

    एमएसएमई विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सेहगल यांनी सांगितले की आग्रा आणि कानपूर येथे उद्योग सुरू करण्यासाठी अनुदानाची मागणी केलीआहे. या प्रस्तावानुसार कानपूरमध्ये ६ हजार चोरस फुट क्षेत्रावर उद्योग उभारले जाणार आहेत. त्यासाठी २४.७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत.

    एमएसएमई विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांनी कानपूर येथे उद्योगांसाठी ११.१९ कोटी आणि आग्रा येथे प्रकल्प उभारणीसाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येईल. या संकुलामध्ये कॉन्फरन्स हॉल, एक्झिबिशन सेंटर, कॅँटीन, बॅँक आणि प्रशासकीय इमारत असेल.

    MSME launches economic revolution in Uttar Pradesh, 76 lakh industries get loans of Rs 2.42 lakh crore, 2 crore youth get jobs

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!