विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मतदान चोरीच्या मुद्द्यापासून ते मतदार यादीच्या शुद्धीकरणापर्यंत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय खासदारांच्या 30 जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याची परवानगी दिली होती, पण काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांना 300 खासदारांची निवडणूक आयोगात घुसखोरी करायची होती. पोलिसांनी हा डाव वेळीच ओळखून खासदारांना निवडणूक आयोगात घुसखोरी करण्यापासून रोखले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI आघाडीच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोग असा मोर्चा काढला. त्यापूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विशिष्ट विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी अपॉइंटमेंट मागितली. निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांना ती अपॉइंटमेंट दिली. आज 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता निवडणूक आयोगाच्या सुकुमार सेन हॉलमध्ये चर्चेसाठी यावे, असे त्यात नमूद केले. परंतु निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील जागेची उपलब्धता आणि पार्किंगच्या जागेची उपलब्धता लक्षात घेता सर्वपक्षीय खासदारांच्या 30 जणांच्या शिष्टमंडळाची सोय करता येऊ शकेल. त्यामुळे 30 खासदारांनी चर्चेसाठी यावे, अशी विनंती निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात केली.
– निवडणूक आयोगाची विनंती फेटाळली
मात्र, निवडणूक आयोगाची ही विनंती राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या मोर्चेकरी खासदारांनी फेटाळली. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या सुमारे 300 खासदारांना एकाच वेळी निवडणूक आयोगामध्ये जाऊन निवडणूक आयुक्त आणि अन्याय अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे असा आग्रह धरला. आम्हाला सगळ्यांना निवडणूक आयोगात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे आहे पण निवडणूक आयोग आमच्याशी बोलायला तयार नाही असा दावा जयराम रमेश यांनी मोर्चादरम्यान केला. त्यांच्या वक्तव्यातूनच 300 खासदारांना निवडणूक आयोगात घुसखोरी करायची होती, ही बाब उघडकीस आली.
निवडणूक आयोगाने 30 खासदारांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली असताना विरोधकांना 300 खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसवायचे होते. पोलिसांनी खासदारांचा हा डाव बरोबर ओळखला आणि त्यांना निवडणूक आयोगात पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेतले. यामध्ये राहुल गांधींपासून सुप्रिया सुळे यांच्यापर्यंतच्या सर्व खासदारांचा समावेश होता. सुमारे दोन अडीच तास खासदारांचे हे आंदोलन चालले नंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
या आंदोलनादरम्यान अखिलेश यादव यांनी पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेट वरून उडी मारली अन्य दोन-तीन महिला खासदारांनी देखील उड्या मारल्या. त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगल्या.
MP’s march from Parliament to the Election Commission of India.
महत्वाच्या बातम्या
- India Alliance इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सोमवारी काढणार मोर्चा
- महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!
- Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा
- Trump : ट्रम्प आर्मेनिया-अझरबैजानमधील 37 वर्षांचे युद्ध संपवणार; आतापर्यंत 6 युद्धे थांबवल्याचा दावा