पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे.राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमले आहे. त्यामुळे मी मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. तरीही खासदार म्हणून आमच्या भावना मांडणे चुकीचे नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. MP Sambhaji Raje Chhatrapati made it clear that there is always respect from Prime Minister Narendra Modi and no question of displeasure
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे.राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमले आहे. त्यामुळे मी मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. तरीही खासदार म्हणून आमच्या भावना मांडणे चुकीचे नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे दौºयावर आहेत. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, नरेंद्र मोदी मला उद्याही भेटीसाठी वेळ देऊ शकतात. पण हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न नाही. समाजाचा विषय आहे. सगळ्या खासदारांना घेऊन मला त्यांना भेटायचे आहे.
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नाही, असे त्यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ, असा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील विचारले होते.
MP Sambhaji Raje Chhatrapati made it clear that there is always respect from Prime Minister Narendra Modi and no question of displeasure