विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणातल्या गुरुग्राम मधली जमीन हडपण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने सोनिया गांधींचे जावई, प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना चौकशी आणि तपासाचे समन्स पाठवल्यानंतर ते काल घरातून पायी चालत येऊन ED ऑफिसमध्ये दाखल झाले. त्यांची काल सहा तास चौकशी झाली. पण आज मात्र मोठ्या तामझमाने प्रियांका गांधी यांनी रॉबर्ट वाड्रा यांना गाडीतून ED च्या ऑफिसपर्यंत आणले. गाडीतून उतरल्यानंतर प्रियांका गांधींनी रॉबर्ट वाड्रा यांना मिठी मारली. त्यानंतर ते एकटेच ED ऑफिसमध्ये चौकशी आणि तपासाला सामोरे गेले.
एकीकडे National herald case मध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात ED मी कोर्टात प्रॉसिक्युशन कंप्लेंट दाखल केली, तर दुसरीकडे रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू झाली. त्यामुळे संपूर्ण गांधी परिवार गडबड घोटाळ्यांच्या कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे स्पष्ट झाले, पण एकट्या प्रियांका गांधीच अजून तरी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर असल्याचे दिसून आले. काँग्रेसने देशभर ED कारवाई विरोधात निदर्शने केली.
मी देशाबाहेर पळून चाललेलो नाही. मी तपास यंत्रणांना चौकशी आणि तपासात पूर्ण सहकार्य केले. त्यांना तब्बल 23 हजार डॉक्युमेंट्स दिली. ED चा चौकशीला मी पंधरा वेळा सामोरा गेलो. यापुढे देखील मी चौकशी आणि तपासाला सहकार्य करेन. मी एवढेच सांगेल की तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे, असे वक्तव्य रॉबर्ट वाड्रा यांनी जारी केले.
MP Priyanka Gandhi Vadra, businessman Robert Vadra arrives at ED office
महत्वाच्या बातम्या
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नाशिकचा रामतीर्थ गोदा घाट समता, बंधुता आणि समरसतेच्या आरतीने दुमदुमला!!
- Virendra Kumar राजकीय फायद्यासाठी विरोधक आंबेडकरांचे नाव वापरत आहेत – वीरेंद्र कुमार
- Mehul Choksi : मोठी बातमी! फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
- Ram Temple Trust राम मंदिर ट्रस्टला आला धमकीचा ईमेल, तामिळनाडूशी जुडले तपासाचे धागेदोरे