प्रतिनिधी
बेंगलोर : गँगस्टर माफिया अतीक अहमद याची हत्या झाल्यानंतर त्याला भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस उमेदवाराची नगरपालिकेतली उमेदवारी काँग्रेसने रद्द केली. पण ज्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला ती कारवाई करावी लागली, त्याच उत्तर प्रदेशातले खासदार इमरान प्रतापगडी यांनी अतीक अहमद वर शायरीची फुले उधळल्यानंतरही त्या प्रतापगडींना काँग्रेसने कर्नाटक स्टार प्रचारकांच्या यादीत नेमले आहे. हे इम्रान प्रतापगडी मूळचे उत्तर प्रदेश मधले असले तरी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना महाराष्ट्रातून निवडून देऊन राज्यसभेवर पाठविले आहे. MP Imran Pratapgadi, the star campaigner of Congress in Karnataka, who showered Shayari flowers on Atiq Ahmed
पण इम्रान प्रतापगडी यांचे स्टार प्रचारक बनणे कर्नाटक निवडणुकीत काँग्रेससाठी गले की हड्डी ठरले आहे. कारण भाजपने कर्नाटक आणि दिल्लीत दोन्ही ठिकाणी काँग्रेसवर शरसंधान साधण्यासाठी इम्रान प्रतापगडी यांनी अतीक अहमदसाठी गायलेली शायरी हा मुद्दा उचलून धरला आहे. मोदी सरकारमधील राज्यमंत्री शोभा करंदलजे यांनी कर्नाटकात इम्रान प्रतापगडी – अतीक अहमद या मुद्द्यावरून काँग्रेसवर शरसंधान साधले आहे, तर भाजपचे प्रवक्ते संदीप पात्रा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्याच मुद्द्यावर काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.
“मेरा अतीक इलाहाबादी” अशी शायरी इम्रान प्रतापगडींनी 6 वर्षांपूर्वी अतीक समोरच एका मुशायऱ्यात गायली होती. त्यावेळी अतीक समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. पण तोच जल्लोष काँग्रेससाठी मात्र कर्नाटक निवडणुकीत 6 वर्षांनंतर अडचणीचा ठरला आहे.
MP Imran Pratapgadi, the star campaigner of Congress in Karnataka, who showered Shayari flowers on Atiq Ahmed
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण