गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. MP Gajanan Kirtikar was appointed after Sanjay Raut was removed from the post of group leader of ShivSena
शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची फेब्रुवारी महिन्यात मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव २१ फेब्रुवारीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. आता याबाबतची अधिकृत माहिती आज (२३ मार्च) लोसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.
गजानन कीर्तिकर हे १९९० ते २००९ या काळात मालाड विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९९५मध्ये शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गुरुदास कामत यांचा १ लाख ८३ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. ते सलग दोनदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
मागील महिन्यात ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच, राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालही सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
MP Gajanan Kirtikar was appointed after Sanjay Raut was removed from the post of group leader of ShivSena
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!