विशेष प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गात 360 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले या प्रशिक्षणार्थींचे अतिशय शिस्तबद्ध संचलन रविवारी शहरात उत्साहात झाले. या संचालनादरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संचलनाच्या निमित्ताने सोलापूरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाणारी शिस्त आणि देशभक्ती अनुभवली.
हरीभाई देवकरण शाळेत सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर, वर्ग कार्यवाह राहुल पुंडे, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगाव, सोलापूर शहराचे संघचालक राजेंद्र काटवे आदी अधिकारी संचलनामध्ये सहभागी झाले होते.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व देशभक्तीमुळे वातावरणात निघालेल्या या संचलनाच्या सुरुवातीला स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानंतर स्वयंसेवकांचे पहिले घोषपथक त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरु असलेला भगवा ध्वज हाती घेऊन निघालेल्या स्वयंसेवकास चार ध्वज संरक्षकांचे सुरक्षाकडे, त्यानंतर पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानंतर पुन्हा दुसरे घोषपथक आणि त्यामागे पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या अशा पद्धतीने या वर्गाच्या शिस्तबद्ध संचलनाची रचना करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता प्रथमतः हरिभाऊ देवकरण प्रशाला येथून या संचलनास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवकांचे सेवकांचे गुरु असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजास प्रणाम करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या संचालनास सुरुवात झाली.
पारंपारिक वाद्यांच्या सुरेख, लयबद्ध तालात ह संचलन हरिभाई देवकरण प्रशाला ते सिद्धेश्वर मंदिर – आंबेडकर चौक मार्गे डफरीन चौक ते पटवर्धन चौक मार्गे कोनापुरे चाळ, जैन मेडिकल, कुमार चौक मार्गे वाडिया रुग्णालय ते पटवर्धन चौक, डफरीन चौक, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट मार्गे पुन्हा हरीभाई देवकरण प्रशालेत संचलनाची सांगता झाली. या संचलनात सोलापूर शहरातील अनेक स्वयंसेवकांनी व्यवस्थेसाठी म्हणून सहभागी होत संचालन मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी सहाय्य केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि डफरीन चौकातील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. विशेष म्हणजे इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात संघाच्या लाखो स्वयंसेवकांना त्यांनी तुरुंगात डांबले होते. त्यावेळी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
या संचलनामध्ये ३६० प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण गणवेश धारण केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध,देशभक्तीमय संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. डॉ.आंबेडकर चौकात हिंदुराष्ट्र सेना यांच्या वतीने संचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तसेच डफरीन चौकात, डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्यावतीने संचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Movement of 360 trainees of the team to Solapur
महत्वाच्या बातम्या
- सावरकर जयंती दिनी अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग!!
- वर्क फ्रॉम होम ऐकलं होतं, वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदाच पाहिलं, राजनाथ सिंग यांचा केजरीवालांना टोला!!
- १ जूनपासून बदलणार ‘हे’ ५ नियम ; जाणून घ्या, तुमच्या खिशावर किती परिणाम होणार? नियमांचे उल्लंघन झाले तर किती भरावा लागणार दंड
- नवी दिल्लीत भीषण दुर्घटना! बेबी डे केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत सात बालकांचा मृत्यू