• Download App
    हालाखीमुळे जन्मदात्या आईने बाळाला अवघ्या ५० हजाराला विकले!| Mother gave child for only 50 K

    हालाखीमुळे जन्मदात्या आईने बाळाला अवघ्या ५० हजाराला विकले!

    विशेष प्रतिनिधी

    गोरखपूर – तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचे बतावणी करत ५० हजार रुपयाला बाळाला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बेपत्ता झालेले बाळ दोन तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. Mother gave child for only 50 K

    घरची स्थिती हालाखीची असल्याने तीने मुल विकण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाचे वडील भंगार गोळा करण्याचे काम करतात. हे बाळ दत्तक घेतल्याचा दावा दुसऱ्या पालकांनी केला आहे तर अन्य लोकांनी, ते बाळ ५० हजारांच्या बदल्यात दिल्याचे सांगितले. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.



    गोरखनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इलाहीबाग येथील सलमा खातून नावाची महिला पोलिस ठाण्यात आली आणि तिने आपल्या तीन महिन्याचे बाळ पळवून नेल्याचे सांगितले. परंतु तिने अपहरण केल्याची खोटीनाटी कथानक तयार केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

    कारण रसलपूर भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता खातून ही स्वत:च एका महिलेला बाळ देत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ती इ-रिक्षातून निघून गेल्याचे दिसत होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बाळाला घेणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला. तेव्हा ती हुमायूंपूर रोडवर आढळून आली आणि बाळही लगेच सापडले.

    Mother gave child for only 50 K

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा