विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला दहशतवादविरोधी कारवाईत आणखी मोठे यश मिळाले. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्याला कंठस्नान घातले. फिरोझ अहमद दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे.Most wanted terrorist killed in J and K
काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील उजरामपथरी गावात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर, पोलिस व सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री या परिसराला वेढा घालून शोधमोहिम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी शरणागतीचे आवाहन केले.
मात्र, दहशतवाद्याने ते धुडकावत दलावर बेछूट गोळीबारास सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल दलाने केलेल्या गोळीबारात दहशतवादी फिरोझ दार ठार झाला. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे व दारूगोळाही जप्त करण्यात आला. फिरोझ काश्मीर खोऱ्यात २०१७ पासून सक्रिय होता.
हा दहशतवादी ए+ श्रेणीतील होता. शोपियाँमध्ये २०१८ मध्ये केलेल्या हल्ल्यात चार पोलिस हुतात्मा झाले होते. यासह इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांत त्याचा सहभाग होता. मंगळवारीच सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्करे तैयबाचा दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर, सलग दुसऱ्या दिवशी दलाला हे यश मिळाले.
Most wanted terrorist killed in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज
- Bank strike : राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर ;सलग चार दिवस काम ठप्प?
- अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना बजावलेले समन्स रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
- बदल्यांमधील भ्रष्टाचाराचा अहवाल दिल्यामुळेच बळीचा बकरा बनवले जातेय, रश्मी शुक्ला यांचा राज्य सरकारवर आरोप