विशेष प्रतिनिधी
जम्मू : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादी कारवाया करणे, स्थानिक लोकांना दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी करून घेणे, असे आरोप असणारा एका अतिरेक्याचा खात्मा नुकताच जम्मू काश्मीर पोलिसांच्या साहाय्याने भारतीय लष्कराने केला आहे.
Most wanted terrorist abu zarari gunned down. success of Indian Army and Jammu and Kashmir Police
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू झरार याला त्याच्या पाकिस्तानमधील म्होरक्यांनी असे आदेश दिले होते की, पूंछ राजोरी भागामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया सुरू करण्यात याव्यात. यासाठी स्थानिक लोकांचा खास करून तरूणांचा देखील सहभाग करून घेण्यात यावा. त्यामुळे अबू झरार आणि त्याचे साथीदार जंगलामध्ये लपून छपून या कारवाई करण्यासाठी रचना आखत होते.
पण त्यांना अन्न,धान्य आणि कपडय़ांसाठी स्थानिक लोकांशी संपर्क साधावा लागला होता. अशाप्रकारे अबू झरारीच्या मोबाइल संभाषणावर पोलीस लक्ष ठेवून होते. आणि त्यानुसारच पोलिसांना त्याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली. आणि ही कारवाई करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले.
Most wanted terrorist abu zarari gunned down. success of Indian Army and Jammu and Kashmir Police
महत्त्वाच्या बातम्या
- MISS UNIVERSE : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूच्या यशात महाराष्ट्राचा वाटा ! ट्रान्सजेंडर साईशा शिंदेची कमाल…
- मोठी बातमी : सहा महिन्यांत लहान मुलांसाठी येणार ‘कोव्हॉवॅक्स’ लस, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख पूनावाला यांची घोषणा
- नव्या वर्षात नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रेट कमी झाले तर ऍमेझॉन प्राइमचे वाढले, जाणून घ्या काय आहेत नवे प्लॅन्स
- संजय राऊतांवरचा एफआयआर मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची फौज पोहोचली दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे!!