• Download App
    palestine flag केरळ मधल्या कोचीन विद्यापीठातल्या माजी विद्यार्थ्यांनी दुबईतल्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना आमंत्रण करण्याचा आगाऊपणा केला

    संतापजनक!! : केरळ मधल्या माजी विद्यार्थ्यांचा शाहिद आफ्रिदीला बोलवण्याचा आगाऊपणा; पुण्यात विद्यार्थ्याने फडकवला पॅलेस्टाईनचा झेंडा!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : केरळ मधल्या कोचीन विद्यापीठातल्या माजी विद्यार्थ्यांनी दुबईतल्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना आमंत्रण करण्याचा आगाऊपणा केला, पण हा आगाऊपणा अंगाशी आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संघटनेने खेद व्यक्त करून हात झटकायचा प्रयत्न केला. पण त्या पाठोपाठ पुण्यात आयसर कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवून पुढचा आगाऊपणा केला.

    केरळ मधल्या कोचीन विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांनी दुबई कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना निमंत्रण दिले. या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेवर सगळीकडून टीकेचा भडीमार झाला. सोशल मीडिया त्यांचे प्रचंड ट्रोलिंग झाले. भारतात आपली चौकशी आणि तपास होईल याची भीती विद्यार्थी संघटनेला वाटली. त्यामुळे त्यांनी झालेल्या प्रकारासंदर्भात लेखी खेद व्यक्त करून हात झटकून टाकायचा प्रयत्न केला. कोचीन विद्यापीठात डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट संघटनांचा दबदबा आहे. त्यातूनच शाहिद आफ्रिदी सारख्या इस्लामी कट्टरवाद्याला निमंत्रण देण्याची कुरापत विद्यार्थी संघटनेने काढली.

    त्यापाठोपाठ पुण्यातल्या आयसर कॉलेजमध्ये पदवीदान समारंभात एका विद्यार्थ्याने पॅलेस्टाईन चा झेंडा फडकवला. मोशिक्करन एस. या विद्यार्थ्याने कधी भारताचा झेंडा हाती घेतला नाही, मात्र पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी आणि इजराइलच्या विरोधासाठी पॅलेस्टाईन चा झेंडा फडकवण्याचे संतापजनक कृत्य केले.

    याआधी देखील अतिरेकी डाव्या विचारांची इकोसिस्टीम म्हणून गेल्या काही दिवसांत आयसर कॉलेज मध्ये वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेने दिवाळी आणि इतर हिंदू सणांच्या कार्यक्रमांना विरोध करून राम मंदिराच्या स्थापना दिनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते. या देशद्रोही प्रकारांना कॉलेजमधल्या डाव्या प्राध्यापकांचा पाठिंबा असल्याचे उघड झाले.

    Moshikkeeran S a left affiliated student IISER Pune did Drama of palestine flag

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार