• Download App
    गुजरात मध्ये मोरवीचा पूल गेला वाहून ; 500 जण बुडाल्याची भीती Morvi bridge in Gujarat washed away; 500 people are feared to have drowned

    गुजरात मध्ये मोरवीचा पूल गेला वाहून ; 150 जण बुडाल्याची भीती; 35 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद :  गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 150 जण नदीत पडले आहेत. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरवीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 150 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 150 जण उपस्थित होते त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली आहे.

    या पुलावर 500 जण असल्याची माहिती समोर आली होती. प्रत्यक्षात पुलावर 150 जण उपस्थित असल्याची माहिती गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते.  या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजण पडले आहे.

    पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती सुरवातीला समजू शकली नव्हती. परंतु पुलावर 150 जण असल्याची माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिल्यानंतर आकड्यांमध्ये स्पष्टता आली आहे.

    या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत पोलीस अग्निशमन दलाचे कर्मचारी करीत आहेत.

     

     

     

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफ च्या टीमला ताबडतोब सूचना देऊन 15 मिनिटात दुर्घटने स्थळापशी हजर राहायला सांगितले. त्यानुसार इंडिया रेटिंग एनडीआरएफची टीम ताबडतोब तिथे पोहोचली

    Morvi bridge in Gujarat washed away; 500 people are feared to have drowned

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र