• Download App
    राजस्थानात सचिवालयासमोर योजना भवनच्या बेसमेंट मध्ये 2000 - 500 च्या नोटांचे सव्वा दोन कोटी आणि एक किलो सोन्याचे घबाड!! More than Rs 2.31 crores cash and about 1 kg of gold biscuits have been found in a bag kept in a cupboard

    राजस्थानात सचिवालयासमोर योजना भवनच्या बेसमेंट मध्ये 2000 – 500 च्या नोटांचे सव्वा दोन कोटी आणि एक किलो सोन्याचे घबाड!!

    वृत्तसंस्था

    जयपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी, 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. पण या नोटबंदीनंतर राजस्थान लागलीच चर्चेत आले आहे. जयपूर येथील योजना भवनाच्या बेसमेंट मधल्या एका कपाटात कोट्यावधींचे घबाड आढळले आहे. कोट्यवधी रुपयांच्या नोटांचा ढीगच या ठिकणी सापडला. त्यात 2000 रुपयांच्या नोटांची बंडलच बंडल आढळल्याने चर्चेला पेव फुटले आहेत. More than Rs 2.31 crores cash and about 1 kg of gold biscuits have been found in a bag kept in a cupboard

    पोलिसांनी दिली माहिती 

    शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटबंदीचा बातमी येऊन धडकल्यानंतर लागलीच जयपूरमध्ये गोंधळ उडाला. जयपूरच्या योजना भवनातील आयटी विभागात (IT Department) 2 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या. या नोटांमध्ये 2000 रुपयांच्या 7298 आणि 500 रुपयांच्या 17108 नोटांचा समावेश आहे. ही एकूण रक्कम 2 कोटी 31 लाख 49 हजार रुपये भरली आहे.

    राजस्थानच्या मुख्य सचिव उषा मिश्रा आणि पोलीस निदेशक आणि पोलिस आयुक्त यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

    मुख्यमंत्र्यांना देण्यात आली माहिती

    नोटांचा इतका मोठा साठा सरकारी इमारतीत सापडल्याने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले. पूर्ण चौकशी झाल्यावरच याविषयीची पुढील अपडेट कळविण्यात येणार आहे. या सर्व घटनाक्रमाची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना देण्यात आली. तसेच 49 जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

    असा लागला तपास

    रात्री उशीरा पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त जयपूरचे आनंद श्रीवास्तव यांनी या घबाड सापडण्याची माहिती. येथील योजना भवनातील IT विभागातील तळघरात दोन कपाट आहेत. त्यांना उघडण्यात आले. त्यामध्ये एक लॅपटॉप बॅग आणि भलीमोठी ट्रॉली सुटकेस सापडली. त्यामध्येच हे घबाड सापडले. लागलीच याची पोलिसांना माहिती देण्यात आली.

    2 कोटी रोख, 1 किलो सोने

    पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. नोटांची मोजणी झाली. यामध्ये 2 कोटी 31 लाख 49 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. 1 किलो सोन्याचे बिस्किट पण सापडले. या नोटांमध्ये मोठ्या प्रमाणावर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या.

    विशेष पथक करतेय तपास

    राज्य सरकारने तातडीने याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली. ही समिती आता पुढील तपास करेल. हे कपाट अनेक महिन्यांपासून बंद असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी हे कपाट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

    ईडी किंवा सीबीआय तपासाची मागणी

    मात्र संबंधित योजना विभाग मुख्यमंत्र्यांच्या आखत्यारित येतो. त्यामुळे राज्याचे पोलीस याचा नि:पक्ष तपास करू शकणार नाहीत म्हणून या सर्व प्रकरणाचा तपास ईडी अथवा सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते राजेंद्र राठोड यांनी केली आहे.

    More than Rs 2.31 crores cash and about 1 kg of gold biscuits have been found in a bag kept in a cupboard

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य