Covid Vaccine : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम आता अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे मंदावला आहे. सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केवळ 89 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा या वर्षातील सर्वात कमी आहे. तथापि, देशातील दक्षिण आणि ईशान्येतील राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये अपेक्षेनुसार घट झालेली नाही. दरम्यान, सरकारने जाहीर केलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे आजपासून लागू होताच लसीकरण मोहिमेनेही प्रचंड वेग धारण केला आहे. पहिल्याच दिवशी देशभरात तब्बल 78 लाखांहून जास्त डोस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. More than 78 lakh Covid Vaccine Doses Are Given on First Day After New Guideline Implementation
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम आता अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे मंदावला आहे. सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केवळ 89 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा या वर्षातील सर्वात कमी आहे. तथापि, देशातील दक्षिण आणि ईशान्येतील राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये अपेक्षेनुसार घट झालेली नाही. दरम्यान, सरकारने जाहीर केलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे आजपासून लागू होताच लसीकरण मोहिमेनेही प्रचंड वेग धारण केला आहे. पहिल्याच दिवशी देशभरात तब्बल 78 लाखांहून जास्त डोस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी देशात नव्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी 78 लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले. तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दुपारी चार वाजता ट्विट केले की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पुढे जात आहे. ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेतील सुधारित मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीनंतर आतापर्यंत 47 लाख कोविड लस डोस देण्यात आले आहेत.
याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी म्हटले की, कोरोना विषाणूचे बदलते स्वरूप आणि नागरिकांची कोविड दक्षता कमी झाल्याने ससर्ग संख्या वाढून दुसर्या लाटेत बदलली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील फ्रंटलाइन वर्कर्सना मास्क वाटल्यानंतर वर्धन यांनी ही टिप्पणी केली होती.
More than 78 lakh Covid Vaccine Doses Are Given on First Day After New Guideline Implementation
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार सक्रिय होताच सोनिया गांधीही झाल्या सावध, 24 जूनला AICC आणि प्रदेश प्रभारींची बैठक
- CBSE 12वीच्या वैकल्पिक परीक्षा 15 ऑगस्टनंतर होण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
- कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना अच्छे दिन!, ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये 3 महिन्यांत 1000% उसळी
- धर्मांतराचे रॅकेट : पाकमधून फंडिंग, पैशांचं आमिष, मुलं-महिलांवर नजर… धर्मांतरण रॅकेटप्रकरणी पोलिसांचे 10 खुलासे
- धर्मांतरणाचे रॅकेट : आधी हिंदूच होता धर्मांतरणाप्रकरणी अटकेतील मौलाना उमर गौतम, सांगायचा मुस्लिम बनण्याची ‘ही’ कहाणी