श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
जम्मू : हिवाळ्याच्या महिन्यांनंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. गिर्यारोहण करण्यासाठी आलेले अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक शनिवारी झालेल्या जोरदार बर्फवृष्टीत अडकले होते. त्यापैकी भारतीय हवाई दलाने (IAF) वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या ३२८ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. More than 300 people stuck in Jammu and Kashmir and Ladakh lives saved due to bravery of air force
माहिती देताना हवाई दलाने सांगितले की, उंचावर अडकलेल्या लोकांना तीन फ्लाइट्समध्ये बाहेर काढण्यात आले. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, 22 जानेवारी रोजी लॉन्च झाल्यापासून, नागरी प्रशासनाच्या समन्वयाने भारतीय हवाई दलाने ‘कारगिल कुरिअर’ सेवेअंतर्गत एकूण 3,442 लोकांना हवाई मार्गाने वाचवले आहे. दरम्यान, 434 किमी लांबीचा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग मुसळधार बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हवाई दलाच्या ‘कारगिल कुरिअर’ सेवेच्या दोन विमानांनी शनिवारी 328 प्रवाशांची हवाई मार्गाने सुटका केली, तर AN-32 च्या तीन उड्डाणांद्वारे 144 प्रवाशांना श्रीनगरहून कारगिलला आणण्यात आले, तर 12 प्रवाशांना विमानाने कारगिलला नेण्यात आले. त्याचप्रमाणे 164 प्रवाशांनी जम्मू ते कारगिल हा तीन फ्लाइटमध्ये प्रवास करून या सेवेचा लाभ घेतला आणि आठ प्रवाशांनी कारगिल ते जम्मू असा प्रवास केला.
More than 300 people stuck in Jammu and Kashmir and Ladakh lives saved due to bravery of air force
महत्वाच्या बातम्या
- भाजपची चौथी यादी जाहीर, 15 नावे; यात पुद्दुचेरीची 1 जागा आणि तामिळनाडूच्या 14 उमेदवारांची नावे
- आता मुइज्जूंच्या डोक्यात पडला प्रकाश, आर्थिक संकटात भारतासमोर हात पसरवला
- हिमाचल प्रदेशातील तीन आमदारांनी दिला राजीनामा
- दिल्ली दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवालांना 28 मार्चपर्यंत ED कोठडी; दिल्ली सरकार चालण्यावर प्रश्नचिन्ह!!