विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू येथे ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट अनेक दिवसांपासून शिजत असल्याचे उघड झाले आहे.आॅगस्ट २०१९ नंतर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तीनशेहून अधिक ड्रोन दिसले, अशी माहिती केंद्रीय सुरक्षा संस्थांकडून देण्यात आली आहे.More than 300 drones spotted near border
सीमा सुरक्षेतील विविध सुरक्षा संस्था पश्चिम सीमेलगत दाट जंगली परिसर, वाळवंट आणि दलदलीच्या परिसरात ड्रोनविरुद्ध विकसित करण्यात आलेल्या काही भारतीय तंत्रप्रणालीची चाचणी करीत आहे. सीमा सुरक्षा दल आणि विविध पोलीस दलांची सीमावर्ती पथके ३,३२३ किलोमीटरच्या सीमेवर ड्रोन, अज्ञात उडत्या वस्तू किंवा दूर नियंत्रित वायुयान दिसताक्षणीच पाडण्याची मानक संचालक प्रक्रिया तयार करत आहे.
शत्रूंचे ड्रोन पाडण्याची सध्याची प्रणाली अशी आहे की, सुरक्षा रक्षकांना जमिनीवर सतर्क राहून ड्रोन दिसताच पाडावे लागते.केंद्रीय सुरक्षा संस्थेने गोळा केलेली आकडेवारी आणि सरकारला याबाबत दिलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दल आणि सीमावर्ती पोलिसांना ५ आॅगस्ट २०१९ पासून तीनशेहून अधिक ड्रोन दिसले आहेत.
५ आॅगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी रद्द करून जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले आले होते.पश्चिम सीमेवर (मुख्यत: जम्मू आणि पंजाब) २०१९ मध्ये १६७ , मागच्या वर्षी ७७ आणि या वर्षी आतापर्यंत ६६ वेळा ड्रोन दिसले.
एखादे लष्करी ठिकाण किंवा परिसराच्या सुरक्षेसाठी सध्या एका गोलाकार ड्रोनविरोधी सुरक्षा प्रणाली उपलब्ध आहे. सीमा सुरक्षेसाठी ड्रोन रोखणे, ठप्प करणे आणि नष्ट करणाऱ्या प्रणालीसारखी एक रेखीय सुरक्षा प्रणाली उपलब्ध नाही.
More than 300 drones spotted near border
- कोव्हॅक्सिनबरोबरच कोव्हिशिल्डचे डोस घेणाऱ्यांनाही युरोपियन देशात अडचणी
- ईडीच्या हाती लागले सर्व पुरावे, अनिल देशमुख यांनाही होणार अटक, मला धमकाविण्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा हात, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा दावा
- होय हप्तावसुलीसाठीच चौकशी, ईडीने ठणकावल्याने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावेच लागणार
- जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनामुळे राष्ट्रीय सुरक्षेत वाढ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास
- आरोग्यमंत्र्यांचा लिपलॉक टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच आता चौकशी