वृत्तसंस्था
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अस्वस्थ राजकीय परिस्थितीत आज बुधवारी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 250 हून अधिक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. More than 250 militants detained in Maharashtra; Official police information
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, जळगाव सह महाराष्ट्रातील विविध शहरांमधून भोंग्यांविना मशिदींमधल्या अजान झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्याचबरोबर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी हनुमान चालीसा लावले आहेत. अनेक ठिकाणी मनसैनिकांच्या धरपकडीच्या बातम्या आल्या आहेत. परंतु यातला अधिकृत आकडा पोलिसांनी दुपारी जाहीर केला आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 250 हून अधिक मनसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
जिथे भोंग्यावरून अजान, तिथे मनसेचे जय हनुमान!!
राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरुन दिलेला अल्टीमेटम 3 मे मंगळवारी संपला. त्यानंतर बुधवारी 4 मे पहाटेपासून मनसैनिक आक्रमक झाले. ज्या ज्या शहरांमध्ये मशिदींमधून अजानचा आवाज भोंग्यावरुन ऐकू आले, त्या त्या ठिकाणी मनसैनिकांनी भोंग्यांवर हनुमान चालिसा लावले.
मुंबईतील अनेक भांगात मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण केले. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
– येथे भोंग्यांवर हनुमान चालिसा पठण
मुंबई, नवी मुंबई तसेच नाशिक या भागात अनेक मशिदींसमोर मनसैनिकांनी
भोंग्यांवरुन हनुमान चालिसा पठण केले. सध्या या ठिकाणांहून अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. ठाणे, मुंबई चारकोप आणि जळगाव येथेही मनसैनिकांनी भोंग्यावरून हनुमान चालिसेचे पठण केले.
जळगावमध्ये हनुमान चालिसा
बुलढाण्यातील खामगाव शहरातल्या चांदमारी भागातील हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी भोंगे ताब्यात घेतले, तर जळगाव जामोदमध्ये पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा पठण केले. जळगाव शहरातील भिल्पुरा पोलीस चौकीजवळ असलेल्या शनी मंदिर परिसरात मंगळवारी हनुमान चालीसा लावण्यासाठी आवाजाची चाचणी घेताना, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन त्यांना नोटीस बजावल्या होत्या.
हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला
नाशिकमध्ये मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जुने नाशिक परिसरातील जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी भोंगे जप्त केले.
More than 250 militants detained in Maharashtra; Official police information
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : स्वागताचा मराठमोळा उत्साह; पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!
- चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म, इंडियन ऑईलला दाखवायचा होता पायलट प्रोजेक्ट
- Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन