वृत्तसंस्था
भवानीपूर : पश्चिम बंगालमधील भवानीपूर हायप्रोफाईल मतदारसंघ कडेकोट बंदोबस्तातला भुईकोट किल्ला बनला आहे. कारण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पोटनिवडणूक उद्या होत आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी केंद्रीय सशस्त्र केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० जादा तुकड्या केंद्रीय राखीव दलाच्या ७ तुकड्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलाच्या प्रत्येकी ५ तुकड्या तसेच सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या ४ कंपन्या एवढा प्रचंड फौजफाटा भवानीपूरमध्ये तैनात करण्यात आला आहे. More than 20 additional companies of CAPF are being deployed for Bhabanipur bypolls that include nearly seven from CRPF
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांनी देखील जबरदस्त प्रचार केला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान जबरदस्त हिंसक संघर्षही झाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मतदान शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय दलाच्या विविध तुकड्या मतदारसंघात तैनात करण्यात आल्या आहेत.
येथे मतदान नि:पक्षपाती पणाने होणे शक्य नाही. कारण पश्चिम बंगालचे पोलीस ममता बॅनर्जी यांच्या हस्तका सारखे वागत आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेला आहे. त्यांनी 80 हून अधिक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्या सकाळपासून सायंकाळपर्यंत भवानीपूर आणि पश्चिम बंगाल मधील कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे केंद्रीय दलान समोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
More than 20 additional companies of CAPF are being deployed for Bhabanipur bypolls that include nearly seven from CRPF
महत्त्वाच्या बातम्या
- कॅप्टन @80 IN BJP : पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू हिट विकेट,तर अमरिंदर सिंह दिल्लीत थेट ! कॅप्टनची नवी इनिंग …
- फ्रान्स गरीब राष्ट्रांना 120 दशलक्ष लस देणार: अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
- चिपी विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे काय ? भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सवाल
- नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा; चंचल – अस्थिर व्यक्ती काय राज्य चालवणार?; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस श्रेष्ठींवर वार