विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तीमत्त्वांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. मागील वषार्चा अपवाद वगळता वर्ष 2017 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत अव्वल स्थानावर आहेत.More searches for PM Modi than Virat Kohli on the internet
मागील वर्षी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर माहिती घेण्यासाठी त्याच्या नावाने सर्च करण्यात आले होते.इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेली बातमी, व्यक्तीमत्त्वे, विविध कार्यक्रम आणि बातम्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आढावा घेतल्या जाणाºया यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आहे.
तिसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर देशाच्या राजकीय पटलावर अधिक ठळकपणे त्यांची दखल घेतली जाऊ लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरही आहे. सोशल मीडियावर फॉलो केलेल्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदींच्या ट्विटर हँडलवर फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन म्हणजेच 70 कोटींहून अधिक आहे.
नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. मोदी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अव्वल होते. ट्रम्प यांना 88.7 मिलियन म्हणजेच 8.87 कोटी लोकांनी फॉलो केलं होतं. मात्र त्यांचं अकाऊंट आता बंद झाले आहे.
More searches for PM Modi than Virat Kohli on the internet
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रपती रायगडावर हेलिकॉप्टरने नव्हे, रोपवेने येणार; शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखल्याबद्दल खा. संभाजीराजेंनी मानले आभार
- धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?
- महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण डोंबविलीत; कोरोना प्रतिबंधक लस आवश्य घ्या; राजेश टोपेंची आग्रही सूचना
- नौदल दिवस 2021 : जगातील सर्वात मोठा ध्वज तिरंगा गेट वे ऑफ इंडिया येथे फडकवण्यात आला