• Download App
    More and more names coming in Congress presidential race, ashok gehlot, shashi tharoor, digvijay singh, manish tiwari are front runners

    राहुल गांधी रेसमध्ये नसतील, हे ‘गृहीत’ धरून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती आणि कोण कोण?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत या गृहीतकावर आधारित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती जण आणि कोण – कोण मैदानात उतरणार आहेत??, याची जोरदार चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत आणि काँग्रेसच्या बाहेरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. More and more names coming in Congress presidential race, ashok gehlot, shashi tharoor, digvijay singh, manish tiwari are front runners

    काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सर्वजण राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष बनवण्यासाठी आतुर आहेत. एकापाठोपाठ एक प्रदेश काँग्रेस कमिट्या राहुल गांधींच्या नावाचा पुकारा करणारे ठराव मंजूर करत आहेत. पण त्याचवेळी अनेक नेत्यांनी राहुल गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नाहीत, असे गृहीत धरून आपापल्या मोर्चेबांधणीला देखील सुरुवात केली आहे. यामध्ये दररोज काही नावांची भर पडताना दिसत आहे. अशोक गेहलोत, शशी थरूर, सुशील कुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे इतकेच नाही, तर ती यादी आता दिग्विजय सिंग आणि खासदार मनीष तिवारी यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वी तर राजस्थान मधले नाराज काँग्रेस नेते सचिन पायलट यांना डार्क हॉर्स किंवा सरप्राईज कॅंडिडेट म्हणून काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जाईल, अशाही बातम्या होत्या पण प्रत्यक्ष काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांचे नाव फारसे कुठे बातम्यांमध्ये दिसले नाही. त्या उलट स्वतः राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत हे गृहीत धरून बाकीच्या नेत्यांची नावे मात्र एकापाठोपाठ एक मैदानात येत असल्याच्या बातम्या आहेत आणि यामध्ये आता दिग्विजय सिंग आणि मनीष तिवारी यांची भर पडली आहे.

    अशोक गहलोत हे गांधी परिवाराचे फेवरेट कॅंडिडेट असल्याचे बोलले जाते. शशी थरूर यांनी देखील तीनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपल्या नावाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेतल्याचे बोलले जाते. मग ही राजकीय टक्कर दोन गांधी समर्थकांमध्येच होणार की पारंपारिक गांधी समर्थक नसलेल्या पण काँग्रेसची निष्ठावान असलेल्या नेत्यांची आपापसात टक्कर होणार??, हे येणारा काळच सांगेल.

    काँग्रेसने आजच अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. अध्यक्षपदाचा अधिकृत अर्ज भरण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली आहे. यामध्ये किती नेते अर्ज भरतात?? किती नेत्यांचे अर्ज डमी असतात?? राहुल गांधी यांच्यासाठी कोण किती ताकतीने लॉबिंग करतात याला काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये विशेष महत्त्व आहे. कारण ही केवळ काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक राहणार नसून नवीन काँग्रेस अध्यक्ष काँग्रेस कार्यकारणी देखील निवडणार आहे ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी मतदान होऊन त्याचा निकाल 19 ऑक्टोबरला लागणार आहे. तोपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाच्या रेसमध्ये राहुल गांधी उतरणार नाहीत हे गृहीत धरून अजून किती नेते उतरतील??, याकडे काँग्रेस सह बाहेरच्याही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    More and more names coming in Congress presidential race, ashok gehlot, shashi tharoor, digvijay singh, manish tiwari are front runners

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!