विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराज याच्या मुक्ततेच्या मागणीसाठी गुडगाव येथे मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी पढण्यात येणाऱ्या नमाजला विरोध करणाऱ्या सुमारे ५० जणांच्या एका समूहाने दिल्लीजवळील गुडगावात हा मोर्चा काढला होता.Morcha to demand release of Kalicharan Maharaja, huge sloganeering in support of Nathuram Godse
नथुराम गोडसे जिंदाबादचे नारेही यावेळी देण्यात आले.महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजास अटक केली आहे. त्याला मुक्त करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
संयुक्त हिंदू संघर्ष समितीचे विधि सल्लागार कुलभुषण भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघर्ष समितीत २२ स्थानिक संघटनांचा समावेश आहे. गुडगावातील सार्वजनिक ठिकाणी पढण्यात येणाºया नमाज विरोधात या संघटना दर शुक्रवारी आंदोलन करतात.
या आंदोलनात आरएसएस व भाजपाचे माजी नेते नरेंद्रसिंग पहाडी यांनीही सहभाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने गेल्या आठवड्याता पतौडी येथे नाताळचा एक समारंभ उधळून लावला होता.
हरिद्वार येथील वादग्रस्त धर्मसंसदेला हजेरी लावणारे महावीर भारद्वाजही आंदोलनात सहभागी होते. याच धर्मसंसदेत कालीचरण महाराजाने महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.
या आंदोलनादरम्यान ह्यनथुराम गोडसे अमर रहे, गोडसेने देश बचाया अशा घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्यानंतर उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यात कालीचरण महाराजाची सुटका करण्याची मागणी करण्यात आली.
Morcha to demand release of Kalicharan Maharaja, huge sloganeering in support of Nathuram Godse
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली
- सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली
- त्रिपुरातील बांग्ला देशींची घुसखोरी कायमची थांबणार, भारत- बांग्ला देश सीमेवर कुंपण उभारले जाणार